पाचोरा येथे विपश्यना साधना शिबिर उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१२/२०२३
पाचोरा येथील श्री. सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिरात खास बालकांसाठी उपशिक्षिका सारिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी विपश्यना शिबिर साधनेचे आयोजन केले जाते. असेच प्रथम चरण आनापान सती या अनमोल विद्येचे शिबीर
दिनांक १० डिसेंबर २०२३ रविवार रोजी मोठ्या उत्साहात उत्साहात संपन्न झाले.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुज्य विश्व विपश्यनाचार्य श्री. सत्यनारायण गोयंकाजी यांच्या व्हिडिओ आणि ऑडिओ द्वारे या अनमोल विद्येची शिकवण बालकांना दिली जाते. शिबिराचे संचालन बाल आनापान शिबीर शिक्षक करतात. यात प्रामुख्याने मुलांना मनावर नियंत्रण, ताबा ठेवण्यासाठी शिकविले जाणारे शिक्षण/तंत्र असते. शिबारार्थी मुलांनी नियमित सराव केल्यानंतर अनेक फायदे यातून जाणवतात. शिबीराला विपश्यना शिबीर केलेले साधक सेवा देतात. हे शिबीर निशुल्क असते.