दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१२/२०२३

काल दिनांक १२ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी पाचोरा येथून जवळच असलेल्या सारोळा गावात एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असलीतरी
या महिलेने तीचा पती मागील काही महिन्यांपासून घरी नसतांना सुध्दा मोठ्या हिंमतीने संसाराचा गाडा ओढणाऱ्या मयत भारती मोची हिने तिची एक मुलगी व दोन मुले या पोटच्या गोळ्यांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या का केली असावी याबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.

कारण मयत सौ. भारती मोची हिचा पती मागील काही महिन्यांपासून घरातून निघून गेला आहे. तसेच भारती ही सासु, सासरे यांना सोडुन तीन मुलांसह वेगळी रहात होती. असे असल्यावरही भारतीने तीन मुलांचा विचार न करता आत्महत्या करण्यासाठीचे कठोर पाऊल का उचलले याबाबत दाट संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मागील काळात किरकोळ कारणावरून सारोळा गावातील एका इसमाने मयत भारती हिच्या वेगळ्या रहात असलेल्या सासरच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली होती तेव्हा त्यांनी याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती अशीही माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे सौ. भारती हि काही दिवसांपासून घरात नाराज व चिंतेत रहात होती हिला फोन आल्यावर ती बोलतांना चिडत होती अशी माहिती मयताच्या मुलीने सांगितली असून सौ. भारतीच्या आत्महत्या करण्यामागे काहीतरी ‘विशाल’ म्हणजे मोठे कारण असावे अशी चर्चा गाव पातळीवर सुरु असल्याने पाचोरा पोलीसांनी या घटनेबाबत या महिलेकडे येणाऱ्या, जाणाऱ्या व्यक्तींची माहिती ती मजुरी करण्यासाठी कुठे व कोणाकडे जात होती तीने कुणाकडून काही आर्थिक देवाणघेवाण केली होती की काय याचा तपास तसेच भ्रमणध्वनीची तपशीलवार माहिती घेतल्यास नक्कीच खरा प्रकार समोर येईल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.