स्वतः चा मुलगा आजारी असतांनाही पोलीसाने माणुसकी दाखवून वाचवले १२ दिवसाच्या बाळाचे प्राण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०९/२०२१
नवजात बाळासाठी देवदूत बनून आला पोलीसदादा.
रावेत पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार नीलेश लोहार यांचा
स्वतःचा मुलगा तापाने फणफणत असल्याने त्यांनी त्यास उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. त्या दवाखान्यात एक १२ दिवसाच्या नवजात बाळाची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी पाहिले होते व त्यांना मदतीची अत्यंत गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते म्हणून त्यांनी स्वतःचा मुलास डॉक्टरांना दाखवून उपचार करवून घेत त्याला पत्नीकडे देऊन रिक्षाने त्यांना घरी पाठवले.
त्यानंतर रावेर येथील डॉक्टर यांनी ते बाळ वाचण्याची शक्यता कमी आहे सिरीयस आहे ,श्वास घ्यायला जास्त त्रास होतोय तरी त्या बाळाला तात्काळ नवजात शिशु कक्षात ठेवावं लागेल, तरी तुम्ही घेऊन जा असे सांगितले परंतु त्यांच्या हालचालीवरुन ते कुटुंब हतबल झाल्याचे पोलिस निलेश लोहार यांच्या लक्षात आले.तसेच इतक्या कमी वेळात रुग्णवाहिका मिळवणे किंवा इतर वाहन व्यवस्था करण्यासाठी वेळ लागणार होता व बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने निलेश लोहार यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या चार चाकी गाडीत नवजात बाळाला आणि त्याच्या आजीला रावेर येथून बुऱ्हाणपूर २५ किलोमीटर अंतर फक्त ३० मिनिटात पार करत त्या बाळाला बुऱ्हाणपूर येथील बालर रुग्णालय मध्ये पोहचवले तसेच त्या बाळावर लागलीच उपचार सुरू केले. आणि त्या बाळाचे प्राण वाचविले आणि आजीला खर्चासाठी पैसेही दिले. बाळ आता सुखरूप आहे.
अश्या खाकी वर्दीतील देव माणसाला सत्यजित न्यूज कडून मानाचा मुजरा