जामनेर व पाचोरा तालुक्यात धर्मस्थळांवर अंधश्रद्येचा बाजार, अंधश्रद्धा निर्मुलन समिती लक्ष देईल का ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२१
पाचोरा व जामनेर तालुक्यातील काही धर्मस्थळांवर बुवाबाजीला ऊत आला असून या ठिकाणी भोंदू बाबांकडून भोळ्याभाबड्या भाविक भक्तांची आर्थिक लुट सुरु असल्याचे खात्रीलायक समजते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील काही धर्मस्थळांवर तसेच जामनेर तालुक्यातील मोराड व मंम्मादेवी पुलाजवळ काही भोंदुबाबांनी धर्मस्थळांवर अनाधिकृतपणे ताबा मिळवून या धर्मस्थळांवर विविध अंधश्रधाळु लोकांच्या कमजोरीचा फायदा घेत आजाराने तसेच कौटुंबिक समस्येने पिडीत लोकांना या ठिकाणी दलालांमार्फत बोलावून त्यांना या संकटातून मुक्त करण्यासाठी करणीकवटाळ तसे मंत्रतंत्र विद्या वापरून संकटमुक्त करण्यासाठी गंडा, दोरा, लिंबू मंत्रुन देणे, तावीत देणे, गंडा, दोरा मंत्रुन देणे असे प्रकार करुन भोळ्याभाबड्या जनतेकडून पैसे उकळण्याचा धंदा सुरु केला आहे.
तसेच गुप्तधन काढून देण्यासाठी आश्वासन देणे त्यासाठी पूजाविधी करुन बळी देणे.
तसेच आपल्या नवसपुर्तीसाठी देवाजवळ भग देणे म्हणजे बळी देण्यासाठी बोकड, कोंबड्यांचा बळी देणे असे अघोरी प्रकार सुरु असून या सर्व प्रकाराकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लक्ष नसल्याने या भोंदुगिरीत दिवसेंदिवस भर पडत आहे. व हजारो अंधश्रध्दाळुची लुट केली जात आहे.
या बाबतीत सत्यजित न्यूज पाठपुरावा करून लवकरच भांडाफोड करणार आहे. तरी ज्यांना याबाबतीत जास्त माहिती असेल त्यांनी सत्यजित न्यूजकडे संपर्क साधावा आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. असे अवाहन करण्यात येत आहे.