
*सोशल मीडिया वर फिरणार एक व्हिडिओ बघून , समाज प्रेम जागृत असणाऱ्या आजी माजी सैनिक ,पोलिस ,आणि msf जवानांनी एका महिलेला दिली रक्षाबंधन ची अनोखी भेट*
सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओ मध्ये तांदूळवाडी तालुका भडगाव या गावात राहणाऱ्या विधवा महिला मिराबाई गायकवाड
यांच्या शेतातील दोन एकर कपाशी काही अज्ञात समाज कंटकानी उपटून टाकल्याने आक्रोश करत असल्याचे दिसत होते . आक्रोश तर होणार कारण शेतकरी पिकांवर स्वतः च्या मुलांप्रमाणे प्रेम करत असतो .
सदर व्हिडिओ विर खान्देशी सेना पाचोरा भडगाव या आजी माजी सैनिक जवानाच्या ग्रुप वर आला , आणि शेतकरी पुत्र असणाऱ्या आणि देशसेवा करत असणाऱ्या जवानाचे कोमल हृदय पाझरले आणि नेहमी प्रमाणे आपण समाजाचे काही देणे लागतो हा उद्देश नजरेसमोर ठेवून जवानांनी त्या बहिणीला शेतात झालेल्या नुकसान भरपाईपोटी 12501 रुपये व रक्षाबंधन ची भेट द्यायचे ठरवले आणि त्या प्रमाणे त्या बहिनिस साडी आणि 12501 रुपये त्याच्या घरी जाऊन भेट म्हणून दिले . यावेळी गावातील सरपंच सिताराम रामचंद्र पवार उपसरपंच सौ मनीषा सूर्यकांत पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष जयंत नारायण पाटील व सामाजिक कार्यकर्ता भाऊसो सतीश आनंदराव पाटील सिद्धार्थ बागुल व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मुरलीधर विश्राम खैरनार भाऊसाहेब रंगराव पाटील वसंत दादाभाऊ पाटील शिवाजी अर्जुन भिल पत्रकार बांधव प्रल्हाद पवार व *असिस्टंट कमांडंट एम टी पाटील सर BSF* माजी सैनिक ज्ञानेश्वर विठ्ठल सोनवणे, माजी सैनिक राजेश पाटील,माजी सैनिक दिपक पाटील,माजी सैनिक समाधान पाटील,माजी सैनिक रवींद्र पाटील,गोपाल प्रकाश पाटील MSF जारगाव ,कैलास पाटील BSF खडकदेवडा, विनोद शेलार BSF पारोळा, मुकेश पाटील CRPF पाचोरा, दीपक पाटीलCRPF तारखेडे, प्रमोद पाटील SSB जारगाव व
*वीर खान्देशी सेना* पाचोरा भडगाव चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते *वीर खान्देशी सेना* हा ग्रुप खान्देशातील आजी माजी सैनिक पोलिस आणि msf जवानांनी मिळून तयार झालेला असून ते देशासेवे सोबत समाज सेवेसाठी नेहमी तयार असतात ,या अगोदर ही या जवानांनी *पांडे मतिमंद शाळा पाचोरा* ,तसेच *मतिमंद निवासी मुलांची शाळा पारोळा* येथे मुलांना मोफत आरोग्य तपासणी करून करून औषधी पुरवली आणि त्यांना स्वेटर व दैनंदिन उपयोगी सामानाची वाटप केले होते, या सारख्या अनेक उपक्रम राबवण्यासाठी वीर खान्देशी सेनेतील सर्व सदस्य नेहमी तत्पर असतात .