केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करणेसाठी उद्या शिवसेनेचे धरणे आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२०
केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उद्या दिनांक ३ डिसेंबर गुरुवार रोजी पाचोरा येथील तहसील कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर नुकतेच शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे मंजूर केले आहेत. सदरच्या कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून, अल्पभूधारक शेतकरी या कायद्यामुळे भरडून निघणार आहे.
या कायद्यांंना केंद्र सरकारने मागे घ्यावेत यासाठी दिल्ली दरबारात देशभरातील शेतकरी व शेतकरी संघटना एकवटून मागील आठ दिवसापासून उन, वारा व उपासमार सहन करुन आंदोलन करीत आहे.
या देशव्यापी आंदोलनाची आजपावेतो केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. उलट आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सत्तेच्या बळाचा गैरवापर करत शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे.
आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हटले जाते. शेतकऱ्यांला जगाचा पोशिंदा व अन्नदाता म्हटले जाते. परंतु त्याच्याच विरोधात शेती कायदे केलेजात असतील तर नक्कीच हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. म्हणून केंद्र सरकारने शेतकरी विरुद्ध केलेले तीन कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पाचोरा येथे शिवसेनेतर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे एका निवेदनाद्वारे जाहीर केले असून सर्व शिवसैनिक व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सकाळी १० वाजेपासून तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सहभागी व्हावे असे अवाहन
शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख श्री. अरुण पाटील, उपजिल्हाप्रमुख अॅड.अभयदादा पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख श्री. गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील तसेच श्री.किशोरजी बारावरकर,श्री. सुरेश पाटील, श्री. बंडू चौधरी,सौ.मंदाताई पाटील. यांच्यातर्फे करण्यात आले आहे.