सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›भडगांव महावितरण हल्ला प्रकरणातील करविता धनी शोधून त्यास तात्काळ अटक करावी- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे

भडगांव महावितरण हल्ला प्रकरणातील करविता धनी शोधून त्यास तात्काळ अटक करावी- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे

By Satyajeet News
June 13, 2021
400
0
Share:
Post Views: 32
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२१

पाचोरा-येथील आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दि. ७ जून २०२१ सोमवार रोजी महावितरण विरोधात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात ताला ठोको आंदोलन केले. या आंदोलनानंतर पाचोरा येथील शिवसेना व युवासेना पदाधिकारी आणि आ.किशोर पाटील यांच्या काही निकटवर्तीयांनी भडगाव महावितरण कार्यालयात जाऊन तोडफोड करत येथील उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे व त्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. या मारहाणीत तंत्रज्ञ के गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

या घटनेतील एकूण ७ आरोपींपैकी ६ आरोपींना पकडण्यात भडगाव पोलिसांना यश आले असून त्यामध्ये क्रमांक १) पाचोरा युवा सेनेचे शहराध्यक्ष संदीप रामदास पाटील, रा. कोंडवाडा गल्ली पाचोरा २) पाचोरा युवा सेनेचे माजी शहराध्यक्ष जितेंद्र विश्वास पेंढारकर, रा. पुनगाव रोड पाचोरा ३) पुनगाव ग्रा.प.सदस्य अनिल (टिल्लू) बारकू पाटील,रा पुनगाव ४) सुमित रवींद्र सावंत रा.पाचोरा ५) चरणसिंग प्रेमसिंग पाटील रा. वडगाव (सतीचे) ता. भडगाव ६) गणेश सुदाम चौधरी, रा. श्रीराम चौक, पाचोरा यांना दिनांक १२ जून २०२१ रोजी अटक करण्यात आली असली तरी करविता धनी मात्र अद्यापही मोकाटच आहे.

याबाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की, अटक झालेल्या सर्व आरोपींचा हा कट पूर्वनियोजित होता, अटक करण्यात आलेले आरोपी पाचोरा येथील आंदोलनात आमदार महोदयांसमवेत हजर असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे. तद्नंतर आंदोलन संपल्यावर सर्व महावितरण अधिकारी व कर्मचारी आप-आपल्या जागी कामासाठी पोहोचले असल्याचे कळताच आरोपींनी भडगांव गाठले व अंत्यत नियोजन बध्द पध्दतीने हा गंभीर गुन्हा केला आहे.

ताला-ठोक आंदोलन कर्त्यावर गुन्हा दाखल होवू नये याबाबत जशी काळजी घेण्यात आली होती. तशी काळजी भडगांव हल्ला प्रकरणी कोणतरी सूत्रधारने घेतली होती. अटकेत असलेले सर्व आरोपी आमदार किशोर पाटील यांचे विश्वासातले व जवळचे लोक आहेत. विशेष म्हणजे आरोपी शिवसैनीक असुन ते शिवसेना युवासेना चे आजी माजी पदाधिकारी,
आमदाराचे निकटवर्तीय आर्थिक लाभार्थी आहेत.

घटनेतील सर्व आरोपी पाचोरा येथील आंदोलनाच्या वेळी आमदाराचा सोबत उपस्थीत दिसतात, त्या नंतर त्यांचे भडगांव येथील महावितरण कार्यालयात जाण्याचे प्रयोजन काय ? ते भडगांव चे रहिवाशी नाहीत. आरोपी भडगांवचे शेतकरी किंवा विज ग्राहक आहेत का ? हल्ला करतांना सर्व आरोपींनी तोंडाला मास्क लावुन चेहरा लपवण्याचे प्रयोजन काय ? गुन्ह्यात वापरलेल्या मोटर सायकलींचे नंबर प्लेट झाकणे व बदलणे यांचे काय कारण ? घटनास्थळी गेल्यावर कोणाच्या ईशान्यावरुन त्यांनी विशिष्ठ अधिकाऱ्याचे नांव विचारले ? श्री. धामोरे यांना लक्ष्य करुन त्यावर जिवघेणा हल्ला का केला ?

या हल्ल्यात अडसर ठरलेले निष्पाप गजानन राणे यांच्या मृत्युला आरोपी सोबतच सुत्रधार जबाबदार नाही का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार किशोर पाटील यांनी देणे गरजेचे आहे.
हे सर्व कृत्य सदर आरोपींनी कोणीतरी सुत्रधाराच्या सांगण्यावरून केले आहे. या संपुर्ण घटनेचा मुख्य सुत्रधार शोधुन त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी दि.०७ रोजी प्रत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत केली होती.

तसे वृत्त प्रसिध्द झाले होते, आमदारांची तीच मागणी अमोल शिंदे यांनी या प्रत्रकार परिषदेत केली. कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याचा निष्पाप बळी आरोपींनी घेतला असून त्यांच्या या कृत्यामुळे आजच त्या कर्मचाऱ्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. घटनेच्या मुख्य सुत्रधाराच्या या कृत्यामुळे राज्यभरात पाचोरा व भडगाव तालुक्याची प्रतिमा मलीन झाली असून शिवसेनेच्या वाढत्या गुंडगिरी मुळे पाचोरा व भडगाव तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे. आणि या दहशतीने जनतादेखील भयभीत झालेले आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार (करविता धनी) यास अटक झाल्यावरच मृत कर्मचान्यांच्या कुटुंबाला व जखमी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खरा न्याय मिळेल.

तसेच मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला शासनस्तरावरुन ५० लाखांची आर्थिक मद्दत व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महावितरणांत तात्काळ नोकरी देण्यात यावी, त्यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव त्यांच्या सोबत असून गरज पडल्यास रस्त्यावर देखील उतरेल असे भाजपाचे अमोल शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी भडगांव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील पाचोरा शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार, दिपक माने, आदी पदाधिकारी उपस्थीत होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांचे ...

Next Article

भडगाव ते पाचोरा दरम्यान अपघातात दोन ठार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा येथे आर्मी ग्रुप तर्फे १ जानेवारी २०२१ रोजी १६०० मीटर धावण्याची स्पर्धा

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने गुढे येथील भीमा माळी यांच्या वारसाला अवघ्या पंधरा दिवसात ४ लाखांची मदत.

    October 12, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आ.किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते कृष्णापुरी भागातील शहर तलाठी कार्यालयाचे भूमीपूजन संपन्न.

    August 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    खाजगी कापूस व्यापाऱ्यांकडून मापात पात, वजन, काटे निरीक्षकाकडून कारवाईची अपेक्षा.

    November 3, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सोयगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस पदी प्रज्वल चव्हाण यांची निवड.

    March 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगांव जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ, जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आदेश.

    May 31, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    सोयगावच्या व्यवसायिकाचे लोहारी जवळ मोटारसायकलला कार आडवी लाऊन ५०,३०० रुपये लुटले. ही घटना संशयास्पद सखोल चौकशी होण्याची गरज.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील श्री. महासर माता राईस मिलच्या वाहनांची वर्दळ ठरतेय वरखेडी व भोकरी गावातील ग्रामस्थांची डोकेदुखी, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.

  • ब्रेकिंग न्यूज

    महाराष्ट्र सरकारने गायीला दिला राज्य मातेचा दर्जा.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज