दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/११/२०२३

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. रघुनाथ दादा पाटील, कार्याध्यक्ष मा. श्री. कालिदास आपटे तसेच बिडचे तालुकाध्यक्ष मा. श्री. राधाकीशन गडदे यांनी पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अंबे वडगाव येथील मा. श्री. संतोष पाटील यांच्या घरी छोटेखानी बैठक घेऊन शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेत शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याचे सांगत आजच्या सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. रघुनाथ दादा पाटील, कार्याध्यक्ष मा. श्री. कालिदास आपटे, बिडचे तालुकाध्यक्ष मा. श्री. राधाकीशन गडदे यांचा संतोष पाटील, शालीकराम मालकर, अरुण पाटील, संजय देवरे, सरपंच बबलू तडवी, हर्षल वाघ, ज्ञानेश्वर वाघ, अमोल पाटील, जितेंद्र पवार, अमोल वाघ यांच्या हस्ते (अमर हबीब लिखित ‘शेतकरी विरोधी कायदे’ हि पुस्तीका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी जगा आणि जगू द्या मंचचे अध्यक्ष निळकंठ पाटील, गुलाब पाटील व बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.