जो आव चैतन्याचा जिव्हाळा कोण दिवस येईल कैसा । नाही देहाचा भरोसा ।। आजीबाईंच्या अंत्ययात्रेत हे भक्तीगीत म्हणत असतांनाच समाधानवर काळाची झडप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२२
(जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला.)
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या कोकडी तांडा येथील एका ९५ वर्षीय आजीबाईंच्या अंतीम संस्कार म्हणजे अंत्ययात्रेसाठी कोळगाव येथुन आलेल्या भजनी मंडळाच्या पथकातील गायकावरच काळाने झडप घातल्याची दुःखद घटना आज रोजी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा या संपूर्ण बंजारा समाज बांधवांच्या गावात सतीबाई बुधा राठोड या ९५ वर्षीय आजीबाईचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. या आजीबाईचा अंत्यविधी करण्यासाठी वाजंत्री लावण्यापेक्षा भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील सरस्वती भजनी मंडळाला बोलावण्यात आले होते. एकाबाजूला सकाळी आजीबाईंच्या अंत्यविधीसाठी तयारी सुरु होती तर दुसरीकडे सरस्वती भजनी मंडळातील भजन गायक समाधान राजेंद्र मरसाळे हा २७ वर्षीय तरुण नेहमीप्रमाणे भावपूर्ण भक्ती गीते सादर करत होता. ही भजनी गीते म्हणत असतांनाच समाधानचा आवाज कमजोर होत गेला व तो काही क्षणातच जमीनीवर कोसळला हे दृष्य पाहून आजीबाईंच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मंडळीने समाधानकडे धाव घेत त्याला उचलून सावलीत घेऊन गेले तेव्हा समाधानला दरदरून घाम फुटला होता.
जमलेल्या लोकांनी समाधानाचा घाम पुसत त्याला शुध्दीवर आणण्यासाठी त्याच्या तोंडावर पाण्याचे छपके मारुन त्याला शुध्दीवर आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र समाधानकडून प्रतिसाद मिळात नसल्याने त्याला तातडीने खाजगी वाहनातून पाचोरा येथील डॉ. निळकंठ पाटील यांच्या वृंदावन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. येथे गेल्यानंतर डॉ. निळकंठ पाटील यांनी तपासणीअंती समाधानला मृत घोषित केले. समाधानाचा मृत्यू हा सततची मेहनत भुकेल्या पोटी जीवन जगत असल्याने अशक्तपणा व अचानकपणे रक्तदाब (लो ब्लडप्रेशर) कमी झाल्यामुळे झाल्याचे समजते.
या घटनेची माहिती पंचक्रोशीतील गावातून कळताच गावागावातून समाधानाच्या चाहत्यांनी पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये जाऊन समाधानचे अंतिम दर्शन घेत हळहळ व्यक्त केली. समाधान हा भूमिहीन गरिब कुटुंबातील व्यक्ती होता. त्याच्या पाश्चात पत्नी व चार मुली आहेत.
समाधान हा मुमिहीन शेतमजूर अठराविश्व दारिद्र्य चार मुली व पत्नीला सोबत घेऊन संसाराचा गाडा कसा ओढायचा याह विवंचनेत जगत असतांनाच त्याला आधीपासूनच भजन, किर्तनाची आवड होती. तो लहानपणापासून भजन गात होता. व त्याच्यावर माता सरस्वती कृपा असल्याने त्याच्या सुमधुर आवाजात भजन म्हणत असल्याने समाधान हा भडगाव, पाचोरा, एरंडोल तालुक्यातील गावागावातून प्रसिद्ध होता. याच कलेतून त्याने मृदंग वादक, हार्मोनियम वादक, टाळकरी, विणेकरी असे जोडीदार सोबत घेऊन एका छोट्याशा ओम्नी गाडीत सरस्वती भजनी मंडळ नावाचं मंडळ सुरु करुन लग्नसोहळे, पाचवीला, नामकरण सोहळ्यात व अंत्यसंस्काराच्या वेळी प्रसंगानुरूप भजन म्हणून आपल्या मधुर आवाजाच्या जादूने दोन पैसे कमाऊन संसाराचा गाडा ओढत होता.
कोकडी तांडा येथील आजीबाईंच्या अंत्ययात्रेत समाधान हा
आत्मा कुडीच लागल भांडण आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून
कुणाच वाड हूड अन कुणाच्या गाया म्हशी मरणाच्या वेडी आत्मा चालला उपाशी
स्वर्गाची वाट यम धरीत मनगट देवाच्या ह्या द्वारी इथं होतंय खर नि खोट, स्वर्गाची वाट यम करीत विचारपूस खर सांग आत्माराज कधी केली का कागस
सरली माझी ओवी मला अजून गवू द्यावं ह्या आई सतीवाईच नाव मुखी घेऊ द्यावं
हे भावपूर्ण भजन म्हणत असतांनाच जमीनीवर कोसळला व क्षणातच या जगाचा निरोप घेत निघुन गेल्यामुळे भडगाव, पाचोरा, एरंडोल तालुक्यातील जनतेतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
समाधानची आवडती भजन
चैतन्याचा जिव्हाळा कोण दिवस येईल कैसा । नाही देहाचा भरोसा ।। १ ।।
व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी ॥२॥
मार्ग धरा पंढरीचा । फेरा चुकवा चौऱयांशीचा ॥३॥
तुका म्हणे धंदा केला । बहु लाभ सापडला ॥ ४ ॥
॥ जय मुक्ताई ।। ॥ ज्ञानोबा तुकाराम ।।
आईवाचुनी जीव कसा तळमळतो बघा
हेबरून वासराचे याटती तवा जवा गाय मले तिच्या मंदी दिसती माझी माझ
प्राया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तान्हा दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा विनमध्ये पाणी टाकिण माले पाजत जाय तवा मले पीठामंधी दिसती माझी माय 3
काव्या कुन्या यचा याचा माथु जाई राणी पायात तिच्या पावन् नसे फिरे अनवानी काव्या न्या भाई तिच मानत नसे पाय तवामले यामध्ये दिसती माझी माय
बाप माझा रोज लावी मायेच्या मागे दुमन झाल शिक्षण आता घेवूदे हाती काम शिकून शाना कुठ मोठा मास्तर होणार हाय मल मास्तर मंदी दिसती माझी माय
बोलता बोलता एकदा तिच्या डोक्यात आल पाणी सांग छो राजा तुझी बुवा दिसल राणी न भरल्या डोळ्या कवा पाईन दुधाए वरची साथ तवा मले साई मंदी दिसती माझी माय ॥४॥
पून्हा एकदा जनम घ्यावा मायू तुझ्या पोटी म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय तवा मले पाया मंदी दिसती माझी माय १५॥
तुझ्याविना मी आई म्हणू
तुझ्याविना मी आई म्हणू कुणाला
कोण वागेल तुझ्या घ्या बाळाला |
९ महिने संकटाले ७ दिवस पोटी वागविले तुजला आई पदरात्या बांधुनी गेली सोडून गेली कोण वागेल तुझ्या या पाडल्याला तुझ्या ह्या बाबाला १ ||
तन कोण धन कोण कलेना आई मजला जिकडे तिकडे मान आहे बहुपैशाला सोडून गेली आई वनवासाला कोण पागल तुझ्या घ्या बाळाला
आले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला दोन दिखाचा विसर पडेल तुझ्या या गोष्टीचा सोडून गेली आई तु आज आम्हाला कोण वागेल तुझ्या या बाळाला
स्वामी तीन्ही जगाचा असुनी आईविना भिकारी
आईचे महत्व या जगाला कधीच कळले नाही सोडुन गेली तुझ्या या रत्नाला कोण वागेल तुझ्या या बाळाला.