पिंपळगाव हरेश्वर येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील हिरव्यागार निंब वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०८/२०२३
एकाबाजूला शासन झाडे लावा, झाडे जगवा अश्या जाहिराती करुन वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन व संवर्धन करण्यासाठी लाखो नव्हे तर कोटीने रुपये खर्च करत आहे. तसेच मागील महिन्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी वृक्षलागवडीवर भरदिला आहे. तसेच उध्दव ठाकरेंवर बाळासाहेब ठाकरे गटाच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी संपूर्ण तालुक्यात पाच हजार रोपांची वाटप करुन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबला असे असतांनाच मात्र दुसरीकडे भर पावसाळ्यात लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे.
मागील पंधरवड्यात बिल्धी गावाजवळ पाचोरा ते जळगाव रस्त्यावर दिवसाढवळ्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात होती. तसेच चार दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर रेल्वे स्टेशन जवळ एक लाकडाचा ट्रक भरला जात असतांनाच दिलीप जैन यांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवर कळवले होते मात्र काय कारवाई झाली याबाबत वनविभागाने अद्याप पावेतो काहीही खुलासा केलेला नाही.
तसेच काल पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील कमानी दरवाजा परिसरातील भरवस्तीत असलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील निंबाच्या महाकाय हिरव्यागार वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल करुन शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. यामुळे या झाडाच्या आसपासच्या रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून या निंबाच्या झाडापासून आम्हाला मिळणारा ऑक्सिजन व सावली हिरावून घेतली गेल्याची खंत व्यक्त केली आहे.
पिंपळगाव हरेश्वर येथील कमानी दरवाजा परिसरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील हिरव्यागार निंब वृक्षाची दिवसाढवळ्या, राजरोसपणे कत्तल होत असतांना निसर्गप्रेमींनी याबाबत चौकशी केली असता संबंधित वृक्ष कापणाऱ्या मजुरांनी तसेच लाकुड व्यापाऱ्यांने संबंधित लोकांशी हुज्जत घातली म्हणून सरतेशेवटी निसर्गप्रेमींनी याबाबत सत्यजित न्यूज कडे धाव घेऊन या निंब वृक्षाची कत्तल का केली गेली याबाबत चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर सत्यजित न्यूज कडून पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे खुलासा मागितला असता याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगुन हात झटकले आहेत. परंतु एवढ्या मोठ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील हिरव्यागार निंब वृक्षाची दिवसाढवळ्या राजरोसपणे कत्तल केली जाते हे मात्र विशेष आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आता सत्यजित न्यूज वृक्षतोड कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल करणारा तो लाकुड व्यापारी कोण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत लवकरच गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे.