वय वर्षे ६८, २५ चा सिटी स्कोर, तरीही डॉ. स्वप्नील पाटील यांनी आजीबाईंना मिळवून दिला वन्स मोर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२१
कोरोनाच महामारीच्या कालावधीत वैद्यकीय क्षेत्रात एकीकडे नवनवीन समस्या निर्माण होत असतांनाच दुसरिकडे नवनवीन संशोधन व काही ठिकाणी चमत्कारिक घटना पहावयास मिळाल्या व त्या अनुभवला आल्या.
असेच एक उदाहरण पाचोरा शहरातील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहावयास मिळाले.
याबाबत डॉ. मा.श्री. स्वप्नील पाटील यांनी दिलेली माहिती अशी की पाचोरा शहरातील शंभू नगर परिसरातील रहिवासी जिजाबाई सर्जेराव गायकवाड वय वर्षे ६८ यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांना उपचारासाठी अगोदरच जळगाव सिव्हिल हॉटेलमध्ये नेण्यात आले नंतर काही कारणास्तव जळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु उपचारादरम्यान प्रकृती साथ देत नसल्याचे लक्षात आल्याने जिजाबाई यांना घरी आणण्याचे ठरवले परंतु घरी न आणता शेवटचा प्रयत्न म्हणून जिजाबाई यांना पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
दाखल करतेवेळी जिजाबाईंचा सिटी स्कोर १५, ऑक्सिजन लेव्हल ७०, सीआरपी १०६ तर शंभर टक्के कोरोना असल्याचे आढळून आले. परंतु डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सिटीस्कॅन केल्यानंतर जिजाबाईंचा सिटी स्कोर २५ पैकी २५ असल्याचे निष्पन्न झाल्यावर मोठी बिकट समस्या उभी राहिली.
डॉक्टरांच्या अनुभवानुसार कोरोना महामारीची लागण झाल्यापासून त्यांच्याकडे कोरोनाच्या उपचारासाठी आलेले जवळपास सहाशे ते सातशे रुग्ण तपासले परंतु त्यांचा सिटी स्कोर जास्तीत जास्त २२ ते २३ पर्यंत पहावयास मिळाला परंतु आजीबाईंचा सिटी स्कोर २५ पैकी २५ असल्यामुळे थोडावेळ डॉक्टरांना चिंतेचा विषय वाटला म्हणून त्यांनी आजीबाईंच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन सत्य परिस्थिती कथन करात उपचारासाठी अडचणी येऊ शकतात असे सांगितले.
परंतु शेवटचा प्रयत्न म्हणून आजीबाईंच्या कुटुंबीयांनी व डॉक्टरांनी उपचार सुरु केले यात डॉक्टर स्वप्नील पाटील यांची योग्य उपचार पद्धती समयसूचकता व रुग्णाला दिलेल्या मानसिक आधारामुळे आजीबाईंनी तब्बल विस दिवसात कोरोनावर मात करत कोरोनाला पळवून लावले व ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या असल्याने गायकवाड परिवारात आनंदमय वातावरणात आजीबाई़चे स्वागत करण्यात आले.
डॉ. स्वप्नील पाटील. यांनी योग्य उपचारपद्धतीने आमच्या आजीबाईंना नवजीवन प्राप्त करुन दिले.म्हणून गायकवाड परिवाराने त्यांचे आभार मानले आहे.