परधाडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पत्रकार प्रतीक महाजन यांची निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/११/२०२३
पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सरपंच शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी पत्रकार प्रतीक महाजन यांचे नाव सुचवण्यात आले होते. पत्रकार प्रतीक महाजन हे परधाडे गावातील सुशिक्षित, तरुण, सामाजिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेऊन गोरगरीब जनतेसाठी कामे करत असतात म्हणून ग्रामसभेत सुचीत केल्याप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी तसेच सरपंच व सदस्यांनी सहमती देत सर्वानुमते प्रतीक महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल बोलतांना प्रतीक महाजन यांनी आपल्या मनोगतात मी समाजाचे व या गावाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून
गावातील विविध वाद, विवाद आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच गावातील सर्व समाजबांधव गोडीगुलाबीने एकत्रित कसे राहतील व एकोपा टिकवून ठेवण्यासाठी तसेच गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध राहील माझ्यावर विश्वास ठेऊन तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी माझी निवड केल्याबद्दल मा. सरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो व तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. या निवडीबद्दल प्रतीक महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.