बाळाच्या मृत्यूस पालकच जबाबदार, संबधितांवर गुन्हा दाखल करावा डॉ. निळकंठ पाटील यांचे पाचोरा पोलीसात निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२३

डॉक्टर म्हटल म्हणजे आव्हानात्मक निदान करुन, रुग्णांना विध्वंसक आजारांना सामोरे जाण्यास आणि त्यावर मात करण्यास मदत करणे आणि प्रिय व्यक्ती गमावल्यानंतर कुटुंबियांना सांत्वन करणारा देव माणूस असे असले तरी सद्यस्थितीत (सगळेच नाही) बरेचसे डॉक्टर आपले कर्तव्य विसरुन फक्त आणि फक्त पैसा कमावण्याच्या नादात लागले असल्याने सद्यस्थितीत सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवनवीन घटनांना सामोरे जावे लागत आहे. अशीच एक घटना काल दिनांक १४ नोव्हेंबरच्या रात्री पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका वृंदावन हॉस्पिटलमध्ये घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त ऐकावयास येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील भगगाव रोडवरील एका नामांकित डॉक्टरांच्या दवाखान्यात एक आदिवासी भिल्ल समाजातील भडगाव येथील १५ दिवसाचे बाळ दुपारच्यावेळी वृंदावन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते. परंतु संबंधित कुटुंब हे आदिवासी भिल्ल समाजातील असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याकारणाने अंगावरील वेशभूषा पाहून संबंधित कुटुंबातील नातेवाईकांना दवाखान्यातील कर्मचारी व सहकारी वर्गाने विचारपूस करण्यात तसेच बाहेरुन लागणारा औषधी व इतर खर्च करु शकतात का या चौकशीच्या फेऱ्यात अडकवून धरत ठेवले तसेच डॉक्टरांनी वेळेवर तपासणी व उपचार न केल्यामुळे बाळ दगावल्याचा आरोप मयत बालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अशातच नातेवाईकांच्या विनवण्या व आग्रह केल्यानंतर डॉक्टरांनी रात्री उशिराने का होईना रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास नवजात १५ दिवसीय बालकाची तपासणी करुन उपचार सुरु केले मात्र दुपारपासून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या बालकावर उशिराने तपासणी व घाईघाईने उपचार करण्यात आल्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला होता तरीही संबंधित डॉक्टरांनी आपली चुक झाकण्यासाठी मृत बालकाला घाईघाईने कापडात गुंडाळून तडकाफडकी पुढील उपचारासाठी जळगाव किंवा पाचोरा सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीचा सल्ला दिला होता असे सांगीतले जात आहे.

हा प्रकार घडल्यानंतर संबंधित आदिवासी भिल्ल कुटुंबीयांनी मृत बालकाला घेऊन पाचोरा येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यात धाव घेतली होती. तसेच पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना योग्य मदत व मार्गदर्शन मिळाले नसल्याने तसेच परिस्थितीने हतबल झालेले आदिवासी भिल्ल कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत पाचोरा शहरात रात्रभर संघर्ष करत होते. तसेच दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ शुक्रवार रोजी सकाळी मयताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी एकलव्य संघटनेतर्फे पाचोरा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

असे असले तरी संबंधित तक्राराने केलेले आरोप हे साफ खोटे असल्याचे सांगून संबंधित मयत बालकाची आई अनिता अनिल मालचे, पालक, जेष्ठ पत्रकार मा. श्री. प्रविणजी ब्राम्हणे व एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. सुधाकर यांनी वृंदावन हॉस्पिटलची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे तक्रार वजा निवेदन वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. मा. श्री. निळकंठ पाटील यांनी नुकतेच पाचोरा पोलीस स्टेशनला दिले आहे.

या निवेदनात डॉ. निळकंठ पाटील यांनी म्हटले आहे की मयत ११०० ग्राम वजनाचे बाळ नाशिकच्या हॉस्पिटल मधून, थंडीच्या दिवसात भडगाव पर्यंत येवढा लांब प्रवास करुन आणले व दोन दिवस घरी स्तनपान केले तसेच वृंदावन हॉस्पिटलला आल्यावर तात्काळ झटके आल्याची माहिती जाणीव पूर्वक लपवून ठेवली तसेच तात्काळ जळगाव सिविल हॉस्पिटलला उपचार घ्यायचा सल्ला दिल्यावर सुद्धा हेतू पुरुस्कृत सुमारे दोन तास पाचोरा सिविल हॉस्पिटलला वेळ घालवला. यामुळे बाळाच्या मृत्युस पालक यांची जबाबदारी निश्चित करून गुन्हा नोंदवावा व शिक्षा द्यावी.

कारण मयत बालकाचे संबंधित कुटुंबातील सदस्य हे आपले पाप झाकण्यासाठी मुद्दामहून समाजामध्ये व प्रसारमाध्यमांना खोटी माहिती देऊन वृंदावन हॉस्पिटलची बदनामी करत असल्याने करुन प्रतिमा मलीन करणे बाबत अनिता अनिल मालचे या बाळाचे पालक, सुधाकर आत्माराम वाघ, प्रवीण ब्राम्हणे यांच्यावर गुन्हा नोंदवून योग्य ती कार्यवाही करावी असे नमूद केले आहे.

ब्रेकिंग ~
संबंधित घटनेवर आधारित आलेल्या तक्रारींची व अर्जांची नोंद घेऊन प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वृत्तांकन करत असतात. तसेच तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा वृत्त प्रसिध्दीस देतात तेव्हा ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली असेल त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून खुलास देणे क्रमप्राप्त आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये तक्रारींची तक्रार घेऊन ज्यांच्या विरोधात वृत्त प्रसारित केले जाते ते पत्रकारांनाच दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करतात. म्हणून अशा खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या विरोधात पत्रकार संघटना लवकरच मा. मुख्यमंत्र्यांनी, मा. जिल्हा पोलिस अधीक्षक व संबंधितांना निवेदन देणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या