गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने, चोराच्या उलट्या बोंबा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील एक आठरावर्षीय तरुण जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळतांना पैसे हारल्यावर जुगाराचे अड्डा मालकाने सदरील तरुणाचा मोबाईल गहाण ठेवत माझे पैसे वेळेवर आले नाही तर तुला महागात पडेल अशी धमकी दिल्यामुळे त्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मागील महीन्यात घडली आहे.
घटना घडल्यापासून मयताचे आई, वडील व मामा संबंधित अड्डा मालकाचे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल होऊन न्याय मिळावा म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला वारंवार जाऊनही गुन्हा दाखल होण्यासाठी उशीर होत असल्याने व जुगाराचे अड्डा मालकास अपूर्ण गुरु भेटल्याने सदरील अड्डा मालकच (चोराच्या उलट्या बोंबा) या प्रमाणे मयताचे कुटुंबियांना बदनाम करत फिरत असून मयताचे कुटुंबियाविरुध्द खोटेनाटे आरोप करुन गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक वृत्त असून कुऱ्हाड गावात चर्चेचा विषय ठरला असून सुज्ञनागरीक व जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अड्डा मालकाविरुध्द त्वरित गुन्हा दाखल होऊन मयताचे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.