पोलिसांना मारहाण करणारांची यंदाची दीपावली जेलमध्येच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१०/२०२१
जामनेर तालुक्यातील लोणी येथे अतिक्रमण काढत असतांना बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण करणा-या सात जणांचा जामीन न्यायालयाने नामंजुर केला. या घटनेप्रकरणी अटकेतील सात जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून यांची यंदाची दीपावली जेलमध्येच साजरी होणार असल्याचा अंदाज आहे.
जामनेर तालुक्यातील लोणी येथील अतिक्रमण काढत असतांना बंदोबस्तकामी हजर असलेल्या पोलिसांना मारहाणीचा प्रकार घडला होता. महिला पोलिस कर्मचा-यांचा विनयभंग, दंगल व कट रचणे या कलमांखाली पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अटकेतील संशयित दत्तू उगले, ज्ञानेश्वर उगले, महादू उगले, भास्कर वाघ, पवन उगले, किर्तीराज उगले, सागर उगले यांना न्यायालयात हजर केले असता त्यांचा जामीन फेटाळण्यात आल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.