वडगाव आंबे बुद्रुक येथे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण, जंतुनाशके फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे बुद्रुक येथील एका ४३ वर्षीय इसमाला डेंग्यू झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून वडगाव आंबे बुद्रुक हे गाव संपूर्ण बंजारा समाजबांधवांचे तांडा वस्तीचे गाव तसेच वडगाव आंबे खुर्द व वडगाव आंबे बुद्रुक या गृप ग्रामपंचायतीवर सद्यस्थितीत प्रशासकीय यंत्रणा काम पहात असून नुकताच ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजला असल्याने सगळीकडे निडणूकीत उमेदवार मिळवण्यासाठी व आपापले पॅनल उभे करण्यासाठी सगळे कामाला लागले असल्याने गावातील स्वच्छता व साफसफाईची तसेच तांड्यातील गसांडपाण्याच्या गटारींच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

अश्या परिस्थितीत वडगाव आंबे बुद्रुक येथे एका ४३ वर्षीय इसमाला डेंग्यू झाल्याचे उघड झाले असून संबंधित रुग्णांवर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. महाजन हे उपचार करत असून त्याला पुढील उपचारासाठी जळगाव पाठवण्यात येत आहे. ही परिस्थिती पहाता वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक या तांडा वस्तीच्या गावात त्वरित जंतुनाशक फवारण्या करुन डेंग्यू आजाराची तीव्रता थांबवण्यासाठी घराघरात जनजागृती करणे गरजेचे आहे. डॉ. महाजन यांनी वेळीच योग्य निदान व उपचार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असल्याचे समजते.

ब्रेकिंग बातम्या