दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०९/२०२२

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथे मागील काही वर्षांपासून गावठाण हद्दीत विद्युत वितरण कंपनीकडून विजेते खांब उभे करण्यात आलेले आहेत. हे खांब उभे करतांना व विद्युत वाहिनीच्या तारा ओढतांना विद्युत वितरण कंपनीकडून सर्व नियम धाब्यावर बसवून भरवस्तीतून अक्षरशा रहदारीच्या रस्त्यावर तसेच खाजगी मालकीच्या शेतजमीन तसेच वापराच्या हमरस्त्यावर वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी हे विद्युत खांब उभे केले असून दोन खांबामधील अंतर २०० फुटांपेक्षा जास्त ठेवण्यात आल्यामुळे विद्युत वाहिनीच्या तारा फक्त चार ते पाच फुटांवर थेट जमिनीवर लोंबकळत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार लेखी स्वरूपात व तोंडी तक्रारी केल्यावरही संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

(व्हिडिओ सबस्क्राईब करा)
या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला असून गाडी बैल, ट्रॅक्टर ही वाहने घरापर्यंत आणणे मुश्किल झाले असल्याने शेतीमाल वाहतूक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मच्याऱ्याची व अधिकाऱ्यांच्या मनमानीला वैतागून वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील नागरिकांनी थेट पाचोरा येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटून समस्या सोडविण्यासाठी विनंती केली असल्याचे चरण महारु राठोड यांनी सांगितले आहे.