कळमसरा येथे विकास विद्यालयात १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील विकास विद्यालय आज १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण कळमसरा गावचे प्रथम नागरिक सरपंच मा.श्री. अशोक दादा चौधरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. वंदना ताई चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करुन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. तुषार पाटील यांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती देत सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी टाळणे, हात धुणे, सर्दी, खोकला होणार नाही याकरिता काळजी घेणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच लसीकरण करुन घेणे किती महत्त्वाचे आहे. व लसीकरणामुळे होणारे फायदे सांगत सगळ्यांनी लसीकरण करुन घ्यावे असे अवाहन सौ.वंदनाताई चौधरी यांनी उपस्थीतांना केले.
या लसीकरणासाठी डॉक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, गावातील तरुण मंडळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.