आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्यातर्फे, डॉक्टर असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०९/२०२३

पाचोरा डॉक्टर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली या नुतन कार्यकारणीचा सत्कार पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन नुकताच करण्यात आला. यावेळी डॉक्टर असोसिएशनतर्फे पाचोरा शहरात एक छोटेसे कार्यालय बांधण्यासाठी जागेचा प्रस्ताव डॉक्टर असोसिएशनचे नुतन चेअरमन मा. श्री. भरत पाटील यांनी आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या समोर ठेवला या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य ठिकाणी डॉक्टर असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागेची व्यवस्था करु असे आश्वासन यावेळी आमदार पाटील यांनी दिले.

डॉ. भरत पाटील (चेअरमन), डॉ. अतुल पाटील (अध्यक्ष), डॉ. प्रवीण माळी (उपाध्यक्ष), डॉ. राहुल काटकर (खजिनदार), डॉ. हर्षल देव (सचिव), डॉ. संकेत विसपुते (सहसचिव), डॉ. बन्सीलाल जैन व डॉ. राहुल झेरवाल (प्रसिध्दी प्रमुख), डॉ. विरेंद्र पाटील व डॉ. योगेश इंगळे (सांस्कृतिक विभाग), डॉ. तौसिफ पठाण व डॉ. सिद्धांत तेली (स्पोर्ट्स विभाग), डॉ. नंदकिशोर पिंगळे, उमेश महाजन, फार्मसिस्ट व इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. तसेच यावेळी संभाजी पाटील यांची तहसीलदार पदी पदोन्नती झाल्याने त्यांचाही आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसैनिक गजू पाटील यांनी विशेष मेहनत घेतले.

ब्रेकिंग बातम्या