पाचोरा शहरात तोतया (मुन्नाभाई) भुलतज्ञांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ, काही मान्यताप्राप्त डॉक्टरांची मुक संमती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१०/२०२२

सद्यस्थितीत पाचोरा शहरात दररोज नवनवीन हॉस्पिटलांची भर पडत असून या हॉस्पिटलमध्ये सगळ्याच आजारांचे व विकारांचे तसेच तज्ञ डॉक्टर वैद्यकीय सेवा बजावत आहेत. यापैकी बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळा अपघातग्रस्त तसेच इतर शारीरिक व्याधींवर उपचार करतांना ऑपरेशन करणे गरजेचे असते म्हणून यासाठी तसे तज्ञ डॉक्टर पाचोरा शहरातील दवाखान्यात उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत व वेळप्रसंगी एखाद्या आजारावर गुंतागुंतीची ॶॅंजीओप्लास्टी किंवा इतर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई किंवा जळगाव येथून तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात येते व काळजीपूर्वक ऑपरेशन, इतर सर्जरी व उपचार केले जातात.

ह्या सगळ्या बाबी खऱ्या असल्यातरी मात्र कोणतेही ऑपरेशन करायचे असल्यास ज्या रुग्णाचे ऑपरेशन करायचे आहे अशा रुग्णांना प्रथम भुल देणे म्हणजे (बेशुद्ध) करणे अत्यंत गरजेचे असते यासाठी भुल देतांना अत्यंत हुशार व अनुभवी भुलतज्ञांची गरज असते. कारण ज्या व्यक्तीला भुल द्यावयाची आहे त्याची शारीरिक क्षमता, ऑपरेशन किती वेळ चालणार आहे याची वेळ लक्षात घेऊन व इतर बाबींचे बारकाईने निरीक्षण करुनच भुल द्यायची असते म्हणून याकरिता मान्यताप्राप्त व हुशार भुलतज्ञाची गरज असते परंतु पाचोरा शहरात एक तोतया भुलतज्ञ (मुन्नाभाई) डॉक्टर सर्रासपणे भुलतज्ञ म्हणून बिनधास्तपणे भुल देण्यासाठी काही मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या दवाखान्यात भुल देण्यासाठीचे काम पहात असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजकडे प्राप्त झाले आहे.

पाचोरा शहरातील हे स्वताला भुलतज्ञ म्हणून मिरवून घेत मर्जीतील डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन रुग्णांना भुल देत असलेतरी मात्र या तोतया (मुन्नाभाई) भुलतज्ञांजवळ मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यवसाचे कोणतेही प्रमाणपत्र किंवा परवानगी नसून हा तोतय भुलतज्ञ फक्त आणि फक्त एक वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदार डॉक्टरांच्या जीवाभावाचा मित्र व सतत वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या डॉक्टरांच्या सानिध्यात राहून वैद्यकीय क्षेत्रात शासनमान्य नसलेल्या संस्थेचे वैद्यकीय शिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र घेऊन बिनधास्तपणे, दिवसाढवळ्या भुलतज्ञाची जबाबदारी पार पाडत आहे व याला त्याचा जीवाभावाच्या मित्राचे पुर्ण सहकार्य मिळत असल्याने हे तोतया भुलतज्ञ बिनधास्तपणे स्वताला मिरवून घेत आहेत.

यात विशेष बाब म्हणजे पाचोरा शहरात अत्यंत हुशार व अनुभवी एकूण चार भुलतज्ञ असून यात एक महिला डॉक्टरचा समावेश आहे व हे चारही डॉक्टर चोवीस तास पाचोरा शहरातील रहिवासी असून चोवीस तास वैद्यकीय सेवा बजावत असतात तरीही बऱ्याचसे नामांकित हॉस्पिटलचे नामांकित डॉक्टर अशा तोतया (मुन्नाभाई) भुलतज्ञांना बोलावून घेतात व आपले काम करुन घेतात ही बाब विचारात घेण्यासारखी असून या तोतया मुन्नाभाई भुलतज्ञांनामुळे एखाद्यावेळेस एखाद्या रुग्णाच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला जात आहे.