भोकरी येथे शिफा क्लिनिक व पटेल नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२)२०२४
मानवी जीवनात डोळ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मणूष्य कितीही सुदृढ किंवा श्रीमंत असलातरी त्यांच्याजवळ डोळे नसले तर मात्र त्याचे जीवन असुन नसल्यासारखे आहे. तसेच बऱ्याचशा लोकांना डोळे आहेत परंतु या धकाधकीच्या जीवनात अनेक कारणांनी डोळ्यांना अनेक व्याधी जडलेल्या असल्याचे आढळून येते. यात दृष्टिदोष, मोतीबिंदू या सारख्या व्याधी जडलेल्या प्रत्येकाकडे वैद्यकीय खर्च करण्याची ऐपत नसते ही बाब लक्षात घेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना लक्षात घेऊन वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी येथील शिफा क्लिनिक व पटेल नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शिबिराचे सुरवातीला नुरानी मददगार फाऊंडेशन तर्फे डॉ. तन्वीर पटेल, डॉ. अश्फाक काकर, विक्रांत राठोड, तोफिक शेख, रजा देशमुख या मान्यवरांचे फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ काकर खजिनदार शोएब नुरानी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तदनंतर शंभराहून अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी करुन गरजूंना डोळ्यांच्या ड्रॉपचे मोफत वाटप करण्यात आले तसेच मोतीबिंदू आढळून आलेल्या रुग्णाचे लवकरच मोफत ऑपरेशन करुन चष्मा वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी नुरानी मददगार फाऊंडेशन व शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांना धन्यवाद देत आभार मानण्यात आले.