डॉक्टर डे” निमित्त पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे १ जुलै रोजी मॅरेथॉन चे आयोजन.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०७/२०२२
पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे “डॉक्टर डे” निमित्त जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी आणि नागरीकांना आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी दिनांक ०३ जुलै २०२३ रविवार रोजी “Run For Health” (पळा आणि तंदुरुस्त रहा) या संकल्पनेतून मॅरेथॉन आयोजित केलेली आहे. सदर मॅरेथॉन एम. एम. कॉलेज ग्राउंड पासून सुरु होऊन हुतात्मा स्मारकाजवळ संपेल या मॅरेथॉनमध्ये सर्व पुरुष व महिला डॉक्टर्स सहभागी होणार आहेत,
सदर उपक्रमाबाबत पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे, चेअरमन डॉ. सुनिल पाटील, अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार, उपाध्यक्ष डॉ. अतुल पाटील सचिव डॉ. नंदकिशोर पिंगळे, महिला अध्यक्षा डॉ. प्रिती मगर यांनी समस्त पाचोरावासियांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.