दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२२

पाचोरा शहरातीलच नव्हे तर भडगाव, पाचोरा तालुक्यातील नामांकित निर्मल इंटरनॅशनल स्कूल प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून हंगामाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिनांक २२ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कॅम्पसमध्ये “स्वर लता” या शीर्षकाखाली लता मंगेशकर यांना समर्पित निर्मल उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आपल्या निर्माल्यांच्या सांस्कृतिक परिदृष्यात एक भव्य घटना असेल. म्हणून या शुभ सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यवरांनी कृपापूर्वक संमती दिली आहे

या निर्मल उत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. अमन मित्तल (आय.एम.एस.), पोलीस अधिक्षक मा. श्री. एम. रामकुमार (आय.पी.एस.) हे उपस्थित राहणार असून माननीय सौ. वैशालीताई सूर्यवंशी, अँड. नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तरी मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी मान्यवरांनी उपस्थित देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संचालिक मा. श्री. भागवत सावंत, मा श्री. मुख्याध्यापक डॉ. मा. श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य मा. श्री. प्रदिप सोनवणे, यांनी केले आहे.