जळगाव जिल्ह्यात १०९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १२ बाधितांचा मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२१
जळगाव जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा १०९३ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर ३५६ ,जळगाव ग्रामीण ३६, भुसावळ ६६,अमळनेर ७६, चोपडा १००, पाचोरा १२, भडगाव २२, धरणगाव ७०, यावल ४३, एरंडोल ५५, जामनेर ३१, रावेर ३५,पारोळा २५,चाळीसगाव ९५,मुक्ताईनगर ३३, बोदवड ३३ आणि इतर जिल्ह्यातील ०५ असे एकूण १०९३ रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात रूग्ण ९७७ बरे झाले असून आतापर्यंत एकूण ६८०७३ रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या ९९७७ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ७९५६३ झालेली आहे. जिल्ह्यात आज १२ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १५१३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.