जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची ११ व्या वषीॅ हि गरुडझेप कायम.
दिनेशजी बोथरा.(पाचोरा)
दिनांक~०३/०६/२०२३
पाचोरा शहरातील नामांकित व शिस्तप्रिय जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाची दहावीच्या १००% यशाची परंपरा सलग ११ व्या वर्षी ही कायम ठेवत विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून संस्थेला नावलौकिक मिळवून दिला आहे.
यावर्षीच्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात प्रथम क्रमांकाने कु. लिशा भाऊसाहेब बोरसे ९५.२०% द्वितीय क्रमांकाने चि.राघव मिलिंद साळुंखे ९३.८०% व तृतीय क्रमांकाने कु. ऊर्जा धमेंद्र धाडीवाल ९३.४०% हे विदयार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष मा. श्री. गिरीषजी कुळकर्णी, सचिव मा. श्री. जीवनजी जैन, स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव मा. श्री. रितेशजी ललवानी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य सौ. पुष्पलता पाटील, सी. ई. ओ. अतुल चित्ते पर्यवेक्षिका सौ. विद्या थेपडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.