मालखेडा गावाजवळ कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२३

अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या जामनेर तालुक्यातील मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान राखीव जंगलाच्या हद्दीतील जामनेर ते पाचोरा रस्त्यालगत आज दिनांक १६ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास एक पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मालखेडा, अंबे वडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मालखेडा गावात उलटसुलट चर्चा ऐकायला येत असून संबंधित इसमाचा घातपात घडवून आणला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

ब्रेकिंग बातम्या