केंद्रसरकारकडून दोन महिन्याचे व राज्यसरकारकडून एक महिन्याचे धान्य मोफत!(पाचोरा तालुक्यात रेशनिंगचे धान्य वाटपासाठी यंत्रणा सज्ज)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०५/२०२१
राज्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र सततचे लॉकडाऊन केल्याने हाताला काम नसल्यामुळे गरिबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याची दखल घेत गोरगरिबांच्या दोनवेळेच्या खाण्यापिण्याची तारांबळ होऊनये म्हणून केंद्रसरकार व राज्यसरकार यांनी गोरगरिबांना मदतीचा हात देत मे व जून या दोन महिन्याचे तर राज्य सरकारने मे महिन्याचे धान्य रेशनकार्डावर मोफत देण्याचे जाहीर केले असून पाचोरा तालुक्यात मे महिन्याचा संपूर्ण कोठा उपलब्ध झाल्याचे पाचोरा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. हे धान्य वाटपासाठी पाचोरा तालुक्यातील पुरवठा विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.
याबाबत पुरवठा विभागसूत्रांकडून प्राप्त माहिती अशी नुसार, केंद्रसरकारने मे व जून या दोन महिन्यात स्वस्तधान्य दुकानातून अंत्योदय कार्डधारक व प्राधान्य कुटुंबांच्या लाभार्थ्यांना संपूर्ण धान्याचा कोठा मोफत देण्याचे जाहीर केले आहे.त्यानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेेतानंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील प्रति व्यक्तींना तीन किलो गहू,दोन किलो तांदूळ दरमहा मोफत देण्यात येत आहेत तसेच राज्य सरकारने घोषित केल्यानुसार मे महिन्यात पुन्हा अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो धान्य प्रति कार्डधारकांना तर प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य देण्यात येणार असून यात तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, मोफत दिला जाणार आहे.
या योजनेत पाचोरा तालुक्यातील अंत्योदय कार्डधारक ९ हजार ८५२ असून प्राधान्य कुटुंबातील व्यक्त्ती १ लाख ६४ हजार ९९० आहेत. पाचोरा तालुक्यात राज्यसरकारकडून एक महिन्याचा धान्याचा कोटा उपलब्ध झाला आहे.यात ६ हजार ४५३ क्विंटल गहू, ४ हजार १७३ क्विंटल तांदूळ, व ७७३ क्विंटल भरड धान्य, मका व ज्वारी उपलब्ध झाले असून ते संबंधित रेशन दुकानदारांना सुपूर्द केले आहे. तसेच केंद्रसरकारकडून देखील मोफत धान्य पुरवठ्या अंतर्गत ६ हजार १८५ क्विंटल गहू, ४ हजार १२३ क्विंटल तांदूळ उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मे व जून महिन्यात नागरीकांना दुप्पट धान्यकोठा मिळणार आहे.
याबाबत पाचोराचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिलेली माहिती अशी की
दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानतून योजनेअंतर्गत धान्य विकत घेणाऱ्या सर्वच कुटुंबाना केंद्रसरकार व राज्यसरकारचा दुप्पट धान्य कोठा मे महिन्यात मोफत वितरित केला जात असून केंद्रसरकरचा कोठा जून महिन्यात देखील मोफत दिला जाणार आहे.तरी लाभार्थ्यांनी रेशन दुकानातून संपूर्ण माल मोफत मिळणार असून रेशनिंग घेतांना रेशनिंगच्या दुकानावर जातांना तोंडाला मस्क लाऊन जावे तसे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करुन एकत्र गर्दी न करता (सामाजिक अंतर) सोशल डिस्टसिंगचे पालन करावे.तसेच रेशनिंगच्या दुकानाबाबत काही तक्रारी असल्यास अथवा मालाचे पैसे मागितल्यास पाचोरा पुरवठा विभागाकडे तक्रार करावी. व जे दुकानदार रेशनिंगचे धान्य मोफत व वेळेवर वाटप करणार नाही त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.