कृष्णापुरी सोसायटीत सतीशबापू शिंदे यांच्या नेतृत्वात चेअरमनपदी धोंडू हटकर तर व्हा.चेअरमन म्हणून ओमप्रकाश पाटील यांची निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०४/२०२२
गेल्या आठवड्यात संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चुरशीच्या लढती नंतर आजी-माजी आमदार पुरस्कृत पॅनलला पराभूत करत भाजप पुरस्कृत पॅनलने सतीशबापु शिंदे व अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपले वर्चस्व कायम ठेवले होते. कृष्णापुरी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडीचा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दिनांक १३ एप्रिल बुधवार रोजी पार पडला.
यावेळी नेहमीप्रमाणे पॅनल मधील इतर संचालकांना संधी देत पॅनल प्रमुख सतीशबापु शिंदे यांनी चेअरमनपदी धोंडू हटकर व व्हाईस चेअरमन पदी ओमप्रकाश पाटील यांची निवड करून सहकारात नवीन आदर्श निर्माण केला आहे. तसेच या सोसायटीमध्ये गेल्या २३ वर्षांपासून सतीशबापु शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व असून, एकीकडे सहकारात संस्था डबघाईला जात असतांंनाच्या काळात मात्र कृष्णापुरी सोसायटी मात्र सतत २३ वर्षापासून पारदर्शक व आदर्श कामकाजामुळे ‘अ’ वर्ग मिळवत आहे. त्यामुळे कृष्णापुरी सोसायटीने संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळे स्थान मिळवले आहे.
या निवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी सतीषबापू शिंदे व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक दिगंबर आहिरे,शिवाजी चौधरी,हेमंत चव्हाण,शिवाजी महाजन,दिलीप नागणे,काशिनाथ पाटील,प्रकाश चौधरी,मुक्ताबाई बोरसे,सिंधुताई शिंदे,प्रेमलाल देसाई व संस्थेचे सचिव नारायण चौधरी उपस्थित होते.