दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२२

वरखेडी येथील अल्ताफ सत्तार काकार यांनी विहीरीत पडलेल्या निल गायीच्या दोन पिल्लांना विहीरी बाहेर काढून जीवदान दिले असून ही निल गायीची पिले वनविभागाचे ताब्यात देण्यात आली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथील अल्ताफ सत्तार काकर यांनी सांगवी शिवारात भाडे तत्वावर शेती केली आहे. आज दुपारी ते शेताकडे गेले असता त्यांना रस्त्यावरील शेतातील विहिरीतून पाण्यात कुणीतरी पोहत असल्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी विहीरीजवळ जाऊन आत डोकावून पाहिले असता त्यांना निल गायीची दोन पिल विहीर पडलेली असून ती पिले पाण्याबाहेर येण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले.

निल गायीची दोन पिले जीव वाचवण्यासाठी धडपडत असतांनाचे दृष्य पाहून अल्ताफ काकर यांनी शेतातील एका मजूराला बोलावून क्षणाचाही विलंब न करता विहीरीत उडी मारली व दोरखंडाच्या साह्याने मित्राच्या मदतीने निल गायींच्या पिलांना सुखरूप बाहेर काढून वनविभागाचे कर्मचारी प्रकाश सुर्यवंशी व योगेश चव्हाण यांच्या ताब्यात दिले अल्ताफ काकार यांच्या समयसूचकतेमुळे आज निल गायींच्या दोन पिल्लांना जीवदान मिळाले म्हणून वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अल्ताफ काकर यांचे आभार मानले आहेत.