पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बुध्दिबळ स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१०/२०२३
क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या व्दारे आयोजित जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा दिनांक १० ऑक्टोंबर २०२३ मंगळवार रोजी १४ वर्षे वयोगटातील दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ बुधवार रोजी १७ वर्षे वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धा जळगाव येथील कांताई सभागृहात संपन्न झाल्या.
या बुध्दिबळ स्पर्धेत पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलची १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थीनी कु. आदिती अलाहीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावल्याने तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच १४ वर्षे वयोगटातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी श्रावणी अलाहित हीने राज्यस्तरीय विजय मिळवल्याने ती विभागीय स्तरावर पात्र ठरली आहे.
या यशाबद्दल विजयी खेळाडूंचे गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. प्रेम शामदानी सर, पर्यवेक्षिका सौ. अमेना बोहरा, शाळेतील शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच क्रीडा शिक्षक दिलीप चौधरी सरांनी या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व सराव करुन घेतल्यामुळे आपल्या गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याचे मत श्री. प्रेम शामदानी यांनी व्यक्त केले.