जय श्रीराम फाऊंडेशन क्रिकेट क्लब तर्फे पिंपळगाव हरेश्वर येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०२/२०२२
पिंपळगाव हरेश्वर व तालुका परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडूंना कळविण्यात आनंद होतो की नववर्षाच्या स्वागतीच्या निमीत्ताने जय श्रीराम फाऊंडेशन क्रिकेट क्लब पिंपळगाव हरेश्वर यांचे विद्यमाने पिंपळगाव हरेश्वर येथे दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ शनिवार पासून खुल्या ११ पाऊली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील क्रिकेट खेळाडू संघांनी या स्पर्धेत भाग घेऊन सामन्यांमध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन करावे व योग्य बक्षीस जिंकून या सुवर्ण संधीचे सोने करुन घ्यावे असे आवाहन जय श्रीराम फाउंडेशन क्रिकेट क्लब तर्फे करण्यात आले आहे.
या सामन्यात भाग घेणाऱ्या संघासाठी पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्यातर्फे प्रथम बक्षिस – ११०००/०० रुपये, मा.श्री. उध्दवभाऊ मराठे यांच्यातर्फे द्वितीय बक्षिस – ५००१/०० रुपये तसेच भाऊसाहेब रवीभाऊ गिते यांच्यातर्फे तृतीय बक्षिस – ३००१/०० रुपये ठेवण्यात आले असून सामन्यात भाग घेण्यासाठी प्रवेश फी ५५१/०० रुपये ठेवण्यात आली आहे. सामन्यात प्रवेश घेण्यासाठी दिनांक १० फेब्रुवारी २०२२ गुरवार ही अंतिम दिनांक आहे.
सामन्यांची नियमावली पुढील प्रमाणे असून अंतिम निर्णय पंचाचा राहील तसेच सामन्यात कुणीही नियम मोडल्यास किंवा वाद घातल्यास संघाला सामन्यातून बाद केले जाईल.
१) प्रत्येक सामना ६ षटकांचा राहील. अंतीम दोन सामने ८ षटकांचे राहील
२) पावर प्ले दोन ओव्हरचा राहील.
३) दोन गोलंदाज दोन ओव्हर टाकतील
४) एल.पी.डब्ल्यू बगळता सर्व नियम लागू राहतील.
५) बॉलरची टाक उचलल्यावर नो बॉल राहील.
६) संघात वाद झाल्यास त्या संघास बाद करण्यात येईल.
७) खेळाडूस काही इजा झाल्यास स्वता: जवाबदार राहील.
८) दिलेल्या वेळेपेक्षा ३० मी उशिरा आलेला संघ बाद राहील.
९) वादग्रस्त संघास बाद करण्याचा राहील.
१०) कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार पंच व आयोजकांना राहिल
११) बक्षीसात फेर बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील. १३) पंचाचा निर्णय अंतीम राहील.
पहिल्या तीन संघाना ट्राफी (श्री कुलस्वामीनी ज्वेलर्स पिंपळगाव हरे)
अधिक माहितीसाठी आयोजक~
विशाल सपकाळ भ्रमणध्वनी क्रमांक ७४९८६३४५५०
प्रदिप मगर भ्रमणध्वनी क्रमांक ८३९०७१४०७२
तुषार कोळी भ्रमणध्वनी क्रमांक ७०५८५१८५७८
दुर्गेश बडगुजर भ्रमणध्वनी क्रमांक ७६२०२४६०३९
ईश्वर कोळी भ्रमणध्वनी क्रमांक ८८८८२४०५२२
यांच्याशी संपर्क साधावा.
सामन्यांचे ठिकाण ग्रामीण रुग्णालयाजवळ, पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा जि.जळगाव.