दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२२

पाचोरा- जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव हौशी बास्केटबॉल असोसिएशन आयोजित उर्वरित जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन नुकतेच जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने विजय पताका फडकवली.

या जिल्हास्तर स्पर्धेसाठी जिल्हयातून विविध तालुका संघ सहभागी झाले होते. गिरणाई शिक्षण संस्था संचालित शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील १४ वर्ष आतील मुले व १७ वर्ष आतील मुली यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्व तालुक्यांविरुद्ध एकतर्फी विजय संपादन करत विभागीय स्पर्धेत आपला विजय निश्चित केला.

संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, उपाध्यक्ष श्री नीरज मुनोत सर, सचिव श्री अँड. जे डी काटकर, सहसचिव शिवाजी शिंदे, भाजपा युवा नेते श्री.अमोल भाऊ शिंदे, शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील सर, व सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सर्व विजयी खेळाडूंचे गिरणाई शिक्षण संस्थेच्या वतीने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा बास्केटबॉल प्रशिक्षक श्री जावेद सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले विजयी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.