गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तर्फे क्रीडा महोत्सव (स्पोर्ट डे) व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२३
मुलांमध्ये शालेय शिक्षणासोबतच त्यांच्यात खेळाडू वृत्ती व खेळातून नवचैतन्य निर्माण होऊन आरोग्य सुदृढ होऊन त्यांची शारीरिक क्षमता वाढावी तसेच सांघिक भावना व एकात्मता निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल तर्फे इयत्ता नर्सरी ते इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बैठ्या व मैदानी स्पर्धांचे क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रिडा स्पर्धेत टेबल टेनिस, हॉलीबॉल, खो, खो, रायफल शूटिंग, बॅडमिंटन यासारख्या मैदानी खेळासोबत बुद्धीला चालना देणारे चेस, टेबल टेनिस, कॅरम यासारख्या क्रीडांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा स्पर्धांचे उदघाटन शाळेचे प्राचार्य माननीय श्री. प्रेम कुमार शामनाणी यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांसोबत पालकांनी आनंद लुटला व पालकांनी त्यांच्या शालेय जीवनातील काही आठवणी व प्रसंग सागत आठवणींना उजाळा दिला. पालकांच्या आयुष्यातील काही प्रसंग ऐकून विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
स्पर्धा आटोपल्यावर लगेचच विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक श्री. दिलीप चौधरी सर, श्री. अमोल देशमुख सर, श्री. विनोद साळवे सर, रायफल शूटिंग प्रशिक्षक श्री. योगेश पाटील सर व सौ. मेघा पाटील मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना अलाहित व पर्यवेक्षिका सौ. अमेना बोहरा यांनी केले.