दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२२

मागील महिन्यापासून आपल्या देशात गाय, बैल व वासरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. ही लागण झाल्याचे लक्षात येताच शासन व प्रशासनाने जीवापाड मेहनत करुन शंभर टक्के लम्पी प्रतिबंधक लसीकरण केले आहे. असे असलेतरी काही शेतकऱ्यांनी व पशुधन पालकांनी लसीकरण करुन घेतले नसल्याने अजूनही नवनवीन गुरांना लम्पी आजाराची लागण झाल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

अशीच काही लम्पी आजाराने बाधित जनावरे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथे आढळून आली असून पंचायत समिती पाचोरा तर्फे अश्या गुराढोरांचा शोध घेऊन उपचारासाठी प्रयत्न करत आहेत. तरीही काही आळशी पशुधन पालक आपली सुदृढ, सशक्त जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून देत आहेत. यातच भरीत भर म्हणून काही लम्पी बांधीत गुरेढोरे सुदृढ व निरोगी जनावरांच्या सोबत चरण्यासाठी जात आहेत. तसेच सायंकाळी गावभर हिंडून गावातील गुराढोरांच्या संपर्कात येत असल्याने पशुधनपालक चिंतेत पडले आहेत.

कारण ज्या जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे अशी जनावरे एका ठिकाणी बांधून ठेवणे गरजेचे असतांनाच काही पशुधनपालक लम्पी आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता मनमानी पद्धतीने वागत असल्याने त्यांची लम्पी बांधीत गुरेढोरे गावभर हिंडत असल्याने लम्पी आजाराची लागण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गावभर भटकणाऱ्या लम्पी बांधीत गुरेढोरांचा त्वरित बंदोबस्त करावा व संबंधित गुरांच्या मालकांना ग्रामपंचायतीने समज द्यावी व त्यांनी न ऐकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पशुधन पालकांनी केली आहे.