वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच झोपडीतला माणूसही झाला राजा. भाग (१)
दिलीप जैन.(पचोरा)
दिनांक~१३/१०/२०२३
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीवर जानेवारी २०२३ पासून प्रशासकीय राजवट लागू आहे. आता नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत नामांकन पत्र दाखल करणे २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून प्र. अ. छाननी तर २५ ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेणे, २५ ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्हाचे वाटप व अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान, सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याप्रमाणे ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे तहसीलदार मा. श्री. यांनी जाहीर केले आहे.
या निवडणुकीत एकुण ११ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून या ११ सदस्यांपैकी लोकनियुक्त सरपंच म्हणून महिला राखीव असून प्रभाग क्रमांक १ ते ४ मध्ये ११ सदस्यांची निवड घेण्यात येणार असून श्री. पी. यू. डहाके मंडळ अधिकारी हे कामकाज पहात आहेत.