युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ ओतारी यांचा चोपडा येथे शिवसेनेत दणदणीत प्रवेश *युवाशक्ती संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह केला शिवसेना पक्षात प्रवेश*
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२०
युवाशक्ती संघटनेचे ढाण्या वाघ अल्पावधीत आपल्या कार्याने चोपडा तालुक्यात नाव कमावून युवकांचे चाहते बनलेले जनसामान्यांचे नेते युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ ओतारी यांनी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन आ.लताताई सोनवणे, माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करत भगवा खांद्यावर घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बोथरा मंगल कार्यालयात चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ ओतारी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ढोलताश्याच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीने आ.लताताई सोनवणे, मा.आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेत दणदणीत प्रवेश करण्यात आला.
“अन्यायाच्या विरोधात तरुणाईचा झंझावात” हे ब्रिद वाक्य घेऊन युवाशक्ती संघटना मागील काही वर्षांपासून चोपडा तालुक्यात कार्यरत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर सर्वच क्षेत्रात युवाशक्ती संघटनेने भरीव कार्य चोपड्यात केलेले आहे. पोलीस बांधवांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस चौकी बांधने असो किंवा आजी माजी सैनिक यांचा “सन्मान शौर्याचा” या माध्यमातून केलेला सन्मान असो, गरीब गरजू विद्यार्थ्यांना दिलेला मदतीचा हात असो किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील जोरदार उपक्रम असोत, समाजातील गरीब बांधवांना वैद्यकीय कामांत लावलेला हातभार असो किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणेसाठी उठवलेला आवाज असो अश्या अनेक उपक्रमांनी युवाशक्ती संघटनेने समाजाप्रती असलेले आपले योगदान दाखवून दिले आहे. रेशन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज तसेच अनेक योजनांबाबत गरीबाच्या तोंडातील घास हिरावणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना यासेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना कशा प्रकारे अद्दल घडवली आहे ते संपूर्ण चोपडा तालुक्यातील जनतेने गेल्या काही दिवस आधीच बघितले आहे. खरोखर अन्यायाचा बिमोड करण्यासाठी युवकांचे संगठन किती महत्वाचे असते हे आपल्या कार्यातून युवाशक्तीने वेळोवेळी सिद्ध करून दिलेले आहे.
सागरभाऊ ओतारी यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश संपूर्ण चोपड्यात चर्चेचा विषय झाला आहे. आतापर्यंत चोपडेकरांनी अनुभवलेला हा मोठा दणदणीत पक्ष प्रवेश असल्याचे म्हटले जात आहे. पक्ष प्रवेश होताच संपूर्ण चोपड्यातून सागरभाऊ ओतारी यांना होत असलेल्या शुभेच्छाच्या वर्षावाने संपूर्ण चोपडा भगवेमय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पक्ष प्रवेशाने चोपडा तालुक्यातील राजकारणात अनेक बदल घडतील अशी चर्चा आता आपापसात जोर धरू लागली आहे. नुकत्याच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील वातावरण राजकीय गप्पांनी तापले असतांना सागरभाऊ ओतारी यांनी केलेल्या पक्षप्रवेशाने अजून त्यात भर घातली आहे व त्यात सर्वदूर याच पक्ष प्रवेशाची चर्चा होतांना दिसत आहे. या प्रवेशामुळे चोपडा शहर शिवसेनेला सागरभाऊ ओतारी यांच्या माध्यमातून दमदार व खंबीर नेतृत्व मिळाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चोपडा शिवसेनेचे पारडे जड झाले असुन होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तसेच आगामी सर्वच निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याचे म्हटले जात आहे. सागरभाऊ यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सर्वांनाच अगदी मनापासून आनंद झाला असुन नवचैतन्य निर्माण झाले असुन सर्वांनी त्यांचे जोरदार स्वागत केले
यावेळी मा.आ.चंद्रकांत सोनवणे म्हणाले की, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली असुन येणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही त्याचेच नियोजन म्हणून युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सागर ओतारी यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने त्यांच्या संघटनाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने युवा कार्यकर्त्यांची शक्ती शिवसेनेला मिळाली आहे. आगामी ग्रामपंचायत,पंचायत समिती, नगरपालिका,खासदार,आमदार,तसेच विविध निवडणुकांसाठी शिवसेनेला युवाशक्ती संघटनेची ताकद तसेच सागरभाऊ ओतरी यांचे निवडणुकांसंदर्भात असलेले नियोजन,संघटन,त्यांच्या सोबत असलेल्या असंख्य अशा युवा वर्ग मिळाल्याने संपूर्ण तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ढाण्या वाघ सागर ओतारी म्हणाले की, मा. बाळासाहेबजी ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन आ.लताताई सोनवणे व मा.आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या विकासाची गंगा बघून आज आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहे. युवाशक्ती संघटनेने आतापर्यंत जनतेसाठी खूप कामे केलेली आहेत. आता शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अधिक बळ मिळाले असुन जनतेसाठी अधिकाधिक कामे करता येतील. आगामी निवडणुका लक्षात घेता चोपडा तालुक्यात शिवसेना,युवासेनेच्या विविध शाखा, तसेच शिवसेना बळकट करण्यासाठी असंख्य युवा वर्ग शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कटिबद्ध राहू. संपूर्ण चोपडा तालुकाच आता भगवामय झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी रात्रीचा दिवस करून काम करायचे आहे. शिवसेना पक्षाचे काम गावो गावी अधिक व्यापक स्वरूपात वाढवून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहिल. आमदार सौ.लताताई सोनवणे मा.आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने यापुढे चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोकाभिमुख कामे होतील.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, जेष्ठ शिवसैनिक दीपकसिंग जोहरी, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, शहर प्रमुख नरेश महाजन, माजी उपसभापती एम.व्ही.पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, ए. के. गंभीर सर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील,महिला तालुका प्रमुख मंगला पाटील, महिला शहर प्रमुख रेखाताई मराठे, तालुका संघटक सुकलाल कोळी,गटनेता महेश पवार, नगरसेवक किशोर चौधरी, नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेवक प्रकाश राजपूत, नगरसेवक महेंद्र धनगर, नगरसेविका मनिषा जयस्वाल, नगरसेविका संध्या महाजन, नगरसेविका मिनाबाई शिरसाठ, नगरसेविका लताताई पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी,युवासेना शहर प्रमुख प्रदीप बारी, वासुदेव महाजन, हरीश पवार, जगदीश मराठे, धीरज गुजराथी, सुनिल बरडीया, प्रविण जैन, नंदू गवळी यासह असंख्य शिवसैनिकांनी सागरभाऊ ओतारी यांचे अभिनंदन केले.