प्राध्यापक व्ही. डी. पाटील यांना मातृशोक.

दिनांक~०१/१०/२०२३

जामनेर तालुक्यातील आचार्य गजाननराव गरुड विद्यालयाचे विज्ञान विभागाचे प्राध्यापक मा. श्री. ही. डी. पाटील सर यांच्या मातोश्री व्दारकाबाई दयाराम पाटील यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता सोयगाव तालुक्यातील बनोटी या मुळ गावी राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आईच्या जाण्याने प्राध्यापक मा. श्री. व्ही. डी. पाटील यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यामध्ये शेंदुर्णी विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शेंदुर्णी नगरीचे सर्व ग्रामस्थ सहभागी आहेत. परमेश्वर पाटील परिवाराला हे दुःख पेलण्याची शक्ती देवो व आईंच्या मृत आत्म्याला चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

ब्रेकिंग बातम्या