पाचोरा सिंधी कॉलनी परिसरात, एका ३३ वर्षीय मजुराचा विद्युत करंट लागून मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०७/२०२२
पाचोरा सिंधी कॉलनी परिसरात भाड्याच्या घरात राहत असलेल्या एका ३३ वर्षीय मजुराचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बऱ्हाणपूर शहरातील प्रताप नगर येथील रहिवासी दिपक संतोष महाजन वय अंदाजे (३३) हा मजुर कामगार कामानिमित्त पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एक भाड्याची खोली घेऊन रहात होता. व मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह चालवत होता.
परंतु सध्या पावसाचे दिवस असल्याकारणाने व डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने दिपक याने झोपण्याअगोदर स्वताच्या अंथरुणावर एक छोटासा पंखा लाऊन तो झोपी गेला होता. त्याला झोप लागल्यानंतर बहुतेक झोपेत त्याचा स्पर्श गादीवर ठेवलेल्या पंख्याला लागला असावा पंख्याला स्पर्श होताच पख्यांत उतरलेल्या विद्युत करंटचा त्याला जोरदार धक्का (शॉक) लागुन झोपेतच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.