सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

राजकीय
Home›राजकीय›किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पाचोरा शिवसेनेची मागणी,

किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पाचोरा शिवसेनेची मागणी,

By Satyajeet News
April 7, 2022
417
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२२

महाराष्ट्राच्या राजकारणातील लबाड बोबड्या महाराष्ट्रद्रोही भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमैया यांनी आय. एन. एस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत तुरुंगात टाका अशा प्रमूख मागणी साठी पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. मुकुंद आण्णा बिल्दीकर व युवा नेते मा.श्री. सुमितदादा किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शिवसेनेतर्फे आज तहसीलदार मा. श्री. कैलासजी चावडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार किरीट सोमय्यांचे छायाचित्र असलेल्या बॅनरला महिला पदाधिकाऱ्यांकडून चपलांचा चोप देण्यात आला तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या सदरील निवेदनात म्हटले आहे की, २०१३ मध्ये आय.एन.एस. विक्रांत वाचवण्यासाठी केंद्र व राज्यसरकारने असमर्थता दर्शवल्यानंतर किरीट सोमय्या पुढे आले व त्यांनी विक्रांत वाचवण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली या मोहिमेत त्यांनी रेल्व स्थानक, विमानतळावर डबे घेऊन उभे राहिले यावेळी आय. एन. एस. विक्रांत हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा व अभिमानाचा विषय असल्याकारणाने देशवासियांनी उदार मनाने सढळ हस्ते दान केले यात नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये निधी सढळ हाताने दिला होता .

मात्र किरीट सोमय्यांनी या जमा झालेल्या निधीचे काय केलं ते देशाला समजायला हवं, कारण या निधीतून मिळणाऱ्या रकमेतून भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युध्द नौकेचे स्मारक
बनविण्याकरिता हा निधी राजभवन येथे जमा करणे गरजेचे होते मात्र किरीट सोमय्याने या निधीतून गोळा केलेली रक्कम राजभवनाला
मिळाली नसल्याचा प्रकार आर. टी. आय. मधून समोर आला
आहे. हा प्रकार लक्षात येताच किरीट सोमय्या यांनी देशाशी गद्दारी करत देशप्रेमाशी खेळ खेळून देशवासियांच्या भावनांशी गद्दारी केली असल्याने त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

कारण किरीट सोमय्याने आय. एन. एस. विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचं काय झालं ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषय आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली होती परंतु राजभवनान आपल्याला किरीट सोमय्याकडून कोणताच निधी मिळाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग हा पैसा कोणाच्या खिशात गेला ? हा पैसा कोणी खाल्ला ? ह्याची उत्तरे राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत. कारण या घोटाळ्यात किरीट सोमय्यांने अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायात गुंतवले आहेत असा आरोप करत देशद्रोही किरीट सोमय्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही निवेदन देत आहोत असे शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन देतेवेळी शिवसेनेचे पाचोरा शहरप्रमुख किशोर बारवकर, बंडू चौधरी, बापू हटकर, गंगाराम पाटील, अनिल सावंत, गजू पाटील, रवी केसवाणी, प्रवीणजी ब्राह्मणे, बापू निंबाळकर, पप्पू जाधव, युवासेना पाचोरा शहरप्रमुख संदीपराजे पाटील, जितू पेंढारकर, वैभव राजपूत, आण्णा चौधरी, जावेद देशमुख, तात्या चौधरी, प्रदीप पाटील, नितीन चौधरी, किशोर पाटील, सागर पाटील, आबा कुमावत, मयूर महाजन, रवी पाटील, प्रवीण पाटील, आकाश पाटील, पिंटू मराठे, भूषण पाटील, अक्षय जैन, निखिल भोई, संदीप पाटील, मोठ्या संख्येने शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 60
Previous Article

शाळेच्या संचालक मंडळाची मनमानी, पालकाच्या डोळ्यात पाणी. ...

Next Article

ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश तांबे तर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedराजकीय

    आखाडा ग्रामपंचायतीचा मात्र आराखडा विधानसभेचा.

    December 30, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा कृ.उ.बा. समिती प्रशासक नियुक्ती आदेश रद्द, तत्कालीन संचालक मंडळाकडे पदभार.

    March 1, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपा पक्ष कार्यालयाचे उदघाटन संपन्न

    November 15, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    अधिकारी सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसतील,तर सर्वसामान्य जनतेची काय कथा ? संतोष पाटील अंबे वडगाव.

    August 21, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

    March 7, 2022
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    महाराष्ट्रात सुट्या सिगारेट-बिडीच्या विक्रीवर बंदी -राज्य सरकारचा निर्णय

    September 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    अधिकाऱ्यांनो अंगातील मरगळ झटका, नाहीतर बसेल कारवाईचा फटका, आ. किशोर आप्पा पाटील यांनी सुनावले खडे बोल.

  • क्राईम जगत

    चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

  • राजकीय

    वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत झालेल्या राजकीय मंथनातून, आज मुख्यमंत्र्यांच्या श्रीमुखात अमृतवाणी होण्याची शक्यता.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज