दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१०/२०२३

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांनी उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, जामनेर तालुक्याचे तालुकाप्रमुख ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, ॲड. प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर जंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर तालुक्यातील वाखारी, पाटखेडा, मोरगाव दिगर येथे छोटेखानी सभा घेत केंद्र व राज्य सरकारने जनतेला कसे मुर्खा बनवले, सगळीकडे खाजगीकरण करुन देश उद्योगपतींच्या हातात देण्यासाठी कसे षडयंत्र, कटकारस्थान सुरु आहे. याबाबत सविस्तर भांडाफोड करत सरकारचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी शेख इस्माईउदिन, शेख सयत, उस्मान शेख, संजय पाटील, विष्णू सोनवणे, रमेश मांडावरे, संजय कुंभारकर, शकील पिंजारी, रघुनाथ तेली, मुनाफ गाणी, योगेश गोसावी, दिलीप तेली, शशी गुजर, निसार कुरेशी, युसुफ कुरेशी, सोनू राजपूत, रघुनाथ नान्नोरे, उमेश जयस्वाल, निलेश मोरे, किशोर त्रिवारी, किरण मोरे, हर्षल चौधरी, ज्ञानेश्वर काळे, समाधान काकडे, नाना मोरे, शेणफडू चौधरी, जय हरी महाराज व वाघारी, मोयखेडा दिगर येधील असंख्य शिवसैनिक शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी व गावातील नागरिक बंधू उपस्थित होते.