माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते बांबरुड येथे विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२३

मागील काळात बांबरुड गावासाठी खडकी धरणावरुन पाणी पुरवठा केला जात होता. मात्र हा पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने बांबरुड ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता व आजही तीच परिस्थिती आहे. परंतु अशा कठीण परिस्थितीत मागील काळात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागु नये म्हणून माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व पी. टी. सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजय वाघ यांनी स्वखर्चाने पाइपलाइन करुन एका खाजगी विहीरीवरुन ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती. या त्यांच्या चांगल्या कामगिरीची पंचक्रोशीतील जनता आजही साक्ष आहे.

परंतु जुन्या व नव्या बांबरुड गावातील ग्रामस्थांना पुन्हा अश्या भिषण पाणीटंचाईची झळ बसु नये व बांबरुडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दोघेही गावांसाठी स्वतंत्र जलकुंभ उपलब्ध करुन दिल्यास ग्रामस्थांसाठी पूर्ण दाबाने व पुरेपूर पाणीपुरवठा करता येईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी दोघेही गावाच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रस्ताव तयार करुन घेत पी. टी. सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजय वाघ व ललित वाघ यांना सोबत घेऊन पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करत पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेत आज दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ बुधवार रोजी पी. टी. सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. सजय वाघ, दगाजी वाघ, प्रा. ललित वाघ यांच्या उपस्थितीत एक लाख पासष्ट हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या जलकुंभाचे व धरणातील विहिरीतून पाणी उचल करण्यासाठी आठ इंची एच. डी. पी. ई. जलवाहिनी कामाचे तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गोडाऊनचे भूमिपूजन करुन बांधकामांचे उद्घाटन केले.‌

या उद्घाटनप्रसंगी नितीन तावडे, खलील दादा देशमुख, मधुकर वाघ, माणिक शिंदे, निवृत्ती सूर्यवंशी, सरपंच अस्ताना तडवी, उपसरपंच प्रदीप वाघ, शशिकांत वाघ, शोभाताई वाघ, ग्रामविकास अधिकारी बी. एस. पाटील यांचेसह बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार स्व. ओंकार आप्पा वाघ यांचा जनसेवेचा वसा माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ व पी. टी. सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजय वाघ यांनी आयम ठेवून ते सतत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असतात असे मत बांबरुड ग्रामस्थांनी व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या