वडगाव आंबे विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रचारासाठी, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीत जाहीर झाली असून या सोसायटीच्या निवडणुकीसाठी उद्या दिनांक ०५ जून २०२२ रविवार रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीत वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, कोठडी तांडा व वडगाव जोगे या गावांचा समावेश असून या सोसायटीत ३१ मार्च २०१९ च्या अहवालानुसार १२६२ एकुण सभासद असून पैकी ३१५ सभासद मयत झाले आहेत तसेच २०५ सभासद थकबाकीदार असल्याने फक्त ७४२ सभासद पात्र असल्याने यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकसहकार पॅनल हे पतंग व नम्रता पॅनल हे कपबशी निशाणी घेऊन मैदानात उतरले आहे.
या निवडणुकीत लोकसहकार पॅनलचे १२ उमेदवार निश्चित झाले असून यात सर्व साधारण मतदारसंघातून जाधव रणजीत मदन, मराठे भास्कर आनंद, पाटील नाना राजाराम, राठोड चरणसिंग महारु, राठोड देविदास दुधा, राठोड सचिन सरदार, शिंदे अमोल रायबा, वंजारी आत्माराम भावडू महिला राखीव मतदारसंघातून मराठे विमलबाई कौतिक, इतर आगास वर्ग (ओ.बी.सी) मतदारसंघातून गायकवाड मंगेश वसंत, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून पवार अरुण बाबुराव, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून कांबळे ज्योतीराम सिताराम हे उमेदवारी लढवत आहेत.
तर यांच्या विरोधात नम्रता पॅनलचे १३ उमेदवार निश्चित झाले असून यात सर्व साधारण मतदारसंघातून चव्हाण गबरु मांगो, चव्हाण प्रेमसिंग मुलचंद, हटकर वामन लक्ष्मण, मराठे गुणवंत ओंकार, पाटील राजु सुकलाल, पवार विकास रतन, राठोड अनिल राजाराम, राठोड भुमेंद्रसिंग भिमसिंग, जाधव सदू मांगो, जाधव नाना गोटिराम, महिला राखीव मतदारसंघातून चव्हाण संगीता प्रवीण, राठोड लिलाबाई उत्तम, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) मतदारसंघातून पाटील संजय प्रभाकर, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून चव्हाण शिवदास पदम, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निकम अविनाश पंडित असे उमेदवार उमेदवारी लढवत असून ही निवडणूक दोघेही पॅनलमध्ये चुरशीची होणार आहे.
या निवडणुकीच्या प्रचारासाठी लोकसहकार व नम्रता पॅनलचे उमेदवार कालपर्यंत आपापल्या पॅनलला उभे असलेल्या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव जोगे व कोकडी तांडा या पाचही गावातील मतदारांना भेटून आमच्या पॅनलच्या उमेदवारांना आपलं बहुमोल मत देऊन विजयी करण्यासाठी हात जोडून मतदान मागत होते.
परंतु आता उद्या सकाळी मतदान होणार असल्याने व या निवडणुकीत वरिल पाच गावांतील मतदात्यांचा समावेश असल्याकारणाने सगळ्यांनी एकत्र येऊन प्रचारासाठी फेरी केल्यास आजचीच रात्र प्रचारासाठी हातात असल्याकारणाने सगळ्यांनी एकत्र फिरुन प्रचार करणे शक्य नाही म्हणून वरिल गावागावांतील उमेदवार आपापल्या गावातच थांबून पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदान करा असे सांगत घराघरात जाऊन हात जोडून विनंती करत आहेत. तसेच काही मतदाते नोकरीनिमित्त बाहेरगावी रहात असल्याने त्यांना मतदान करण्यासाठी गावात आणणे व परत सोडण्यासाठी दोघेही पॅनलचे उमेदवार अथक परिश्रम घेत आहेत.
आजची रात्र वैऱ्याची रात्र~
आजची रात्र महत्वाची असून आपले मतदान कोणीही पळवून नेऊ नये म्हणून दोघेही पॅनलचे उमेदवार, हितचिंतक आजची रात्र डोळ्यात तेल घालून काढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच आजची रात्र ही प्रचारासाठी शेवटची संधी असल्याने थोड्याफार प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसून येत आहे.
(म्हणून वडगाव आंबे विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रचारासाठी, रात अभी बाकी है,
बात अभी बाकी है. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.)