लोहारी येथे माकडाच्या हल्ल्यात तीन जखमी, वनविभागाचा मनमानी कारभार नागरिकांचा आरोप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे उघडे बाबा या देवस्थानाजवळ दिनकर रामचंद्र पाटील, प्रविण सुभाष कोळी, सुनिल चंद्रभान पाटील. हे शेतातून घरी येत असतांना माकडाने त्यांचे अंगावर झेप घेतली व कपडे फाडून पाठीवर, पायाला व हाताला चावा घेतला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाल्याने पुढील अनर्थ टळला.
काही दिवसापूर्वी याच माकडाने लोहारी गावासह शेत शिवारात हैदोस घातला होता. हा प्रकार पाचोरा येथील वन विभागाला कळवल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून या माकडाला धरून नेले होते. परंतु हे माकड गाव वस्तीपासून लांब कुठेतरी जंगलात सोडायला होते. तसे न करता वनविभागाकडून हे माकड त्याच परिसरात पुन्हा सोडण्यात आल्याने हा हल्ला झाल्याचे बोलले जात असून विभागाबाबत सुज्ञनागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने तसेच जंगल परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्याने जंगलातील माकडे व इतर हिंस्र प्राणी गावाकडे वळाले असून जंगलपरिसरात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच वृक्षतोड असीच सुरू राहिल्यास भविष्यात खूप अडचणीचे ठरणार आहे. तरी वनविभागाने वृक्षतोड थांबवू या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पाचोरा व जामनेर तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे.