दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२३

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे आणि विश्व हिंदू परिषदेच्या षष्ठी पुरती म्हणजे ६० वर्षे पूर्ण झाले या अनुषंगाने पाचोरा येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे दिनांक १० ऑक्टोंबर २०२३ मंगळवार रोजी शौर्य जागरण रथयात्रा काढून हा दिवस साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने जामनेर रस्त्यावर असलेले पुरातन श्रीराम मंदिरापासून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे बहुसंख्य कार्यकर्ते व नागरीकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात रथ यात्रेला सुरुवात करण्यात येऊन श्रीमंत श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शौर्य जागरण रथयात्रा आल्यावर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शौर्य जागरण रथ यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी श्रीमंत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने चौक दणाणून गेला होता.

हा शौर्य जागरण रथयात्रा उत्सव सोहळा उत्सव प्रमुख योगेशजी पाटील, पाचोरा प्रखंड मंत्री योगेशजी सोनार, प्रखंड संयोजक बंटीजी पाटील, जिल्हा संयोजक अतुलजी, पाटील प्रखंड सह गोरक्षक भैय्याजी पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रवीणजी पाटील, प्रखंड विद्यार्थी प्रमुख जय बागुल, ज्ञानेश्वर भोई, विशाल सोनवणे, ललित पाटील, मनोज पाटील, राजू चव्हाण, पंकज देसले, समाधान पाटील, गोकुळ पाटील, असंख्य राम भक्त बजरंगी शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत पार पडला.