भक्तांबर महिला मंडळाची कोल्हे येथील स्व.रुपचंद बाफना गोशाळेला सदिच्छा भेट
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील बाफना कृषी विद्या प्रसारक संस्था संचलित स्वर्गीय रूपचंद बाफना गोशाळेला, संघवी कॉलनी पाचोरा येथील भक्तांम्बर महिला मंडळाच्या सदस्या सौ.चंदाबाई संघवी,सौ.सुरजबाई बोरा,सौ.चंचलबाई संघवी, सौ.शंकुतलाबाई संघवी, सौ.कमलाबाई संघवी, सौ.रंजनाबाई संघवी,कु.स्वीटी संघवी, सौ.लताबाई संघवी,किरण बाफना, दिपाली बाफना, प्रिती संघवी, उषाबाई बांठीया यांनी काल दिनांक ०९ जानेवारी रविवार रोजी नुकतीच भेट दिली.
या भेटी दरम्यान भक्तांबर महिला मंडळाच्या सदस्यांनी गोशाळेतील गायींना चणाडाळ व गुळ खाऊ घालून गायत्री मंत्र पठण करत गायींच्या पाठीवरून हात फिरवला. तसेच गोशाळेतील गायींसाठी एक ढेपचे पोते, दहा किलो चणाडाळ, पाच गुळाच्या भेल्या व ९११/०० रुपये रोख देणगी स्वरुपात दिले. गोशाळेत नवकार मंत्रची सतत धुन सुरू असल्याने, तसेच गाईंचा गोठा, गोशाळा व गाईंची व्यवस्थापक पाहून रमेशचन्द्रजी बाफना यांचे शब्द सुमनांनी कौतुक केले.
तसेच गोशाळेलगतच्या परिसरात श्रमदान करुन साफसफाई केल्यानंतर शिवारफेरी करून गाईंना चारण्यासाठी चे कुरण व चारा उत्पादनाची साधने तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच इतर शेती शिवार फेरी करून पिकांविषयी माहिती जाणून घेत शेततळ्याची पाहणी केली. नंतर याच निसर्गरम्य वातावरणात सोबत आणलेली शिदोरी सोडून वनभोजनासह, सहभोजनाचा आनंद घेतला. तसेच नवकार मंत्र जाप केल्यानंतर बाफना कृषी शाळेच्या सभागृहात एकत्र येऊन बाफना यांचा छोटेखानी सत्कार करून आपले मनोगत व्यक्त केले.
मनोगत व्यक्त करतांना खेड्यात खरोखरच चांगले जीवन आहे कारण खेडेगावात मिळणारे शुद्ध दुध, भाजीपाला निसर्गाच्या सानिध्यात राहून मिळणारी शुद्ध हवा, पशुपक्ष्यांचे मनमोहक आवाज हे पाहिल्यावर खरोखरच आम्हालाही तुमचा हेवा वाटतो असे सांगत आम्ही जरी बंगल्यात, वातानुकुलीत घरात रहात असलो तरी आम्ही या आनंदापासून खुपच लांब आहोत कदाचित म्हणूनच शेतकऱ्याला शेतकरी राज म्हणून संबोधले जाते अशा भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या, तसेच भक्तांम्बर महिला मंडळाने गोशाळेला भेट दिली म्हणून बाफना परिवाराकडून त्यांचे आभार मानून निरोप देण्यात आला.
या भेटीदरम्यान मा.श्री. रमेशचंद्रजी बाफना यांनी बाफना कृषी व विद्या प्रसारक संस्था तसेच स्वर्गीय रूपचंद बाफना गोशाळेबद्दल सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी भटू पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.