गावात भासतेय पाणी टंचाई, फुटलेल्या जलवाहिनीतून शेकडो लिटर पाणी वाया जाई. अंबे वडगाव ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा इरसाल नमुना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२३
शासनातर्फे दरवर्षी लाखो रुपये खर्च करून पाणी आडवा, पाणी जिरवा अशा जाहिराती करत असते. परंतु या शासनाच्या फतव्याकडे पाचोरा तालुक्यातील अंबे वडगावची ग्रामपंचायतीने कमालीचे दुर्लक्ष केले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सद्यस्थितीत ग्रामपचायतीचा कारभार ग्रामसेवक मा. श्री. म्हस्के आप्पा व प्रशासकीय अधिकारी मा. श्री. धस साहेब पहात आहेत. ग्रामपचायतीवर प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून आजपर्यंत ग्रामसेवक मा. म्हस्के व प्रशासकीय अधिकारी मा. धस साहेबांनी निदान एक वेळेस सुध्दा गावत फेरफटका मारला असता तर त्यांना अंबे वडगाव गावातील गुळगुळीत रस्ते व अतिक्रमण विरहीत पायी चालता येणार नाही अश्या रस्त्यांची जाणीव झाली असती तसेच गावात शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेली अनुदानित शौचालये, गोठा शेड, घरकुलांची तसेच भुमीगत गटारी चोरीला गेल्याचे लक्षात आले असते.
असो सद्यस्थितीत प्रशासकीय अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे एका बाजूला अंबे वडगाव गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर दुसरीकडे मागील दोन महिन्यांपासून जलवाहिनी फुटली असून या फुटलेल्या जलवाहिनीतून दररोज शेकडो नव्हे तर हजारो लिटर पाणी नाल्यांमध्ये वाहून जात आहे. गावात पाणी टंचाई जाणवत असल्याने गावातील शेतकरी, शेतमजूर महिला, पुरुषांना दिवसभर शेतात राब, राब, राबून थकुन, भागुन आल्यावर सकाळ व संध्याकाळी पाण्यासाठी गावाच्या आसपासच्या परिसरातील विहिरींचे पाणी पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी आणावे लागत असल्याने ग्रामस्थ व महिलावर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
ब्रेकिंग न्यूज
ग्रामपंचायतीच्या कारभाराचा अजब फंडा, उद्योगपतीकडून घेतला गंडा, व मुख्य जलवाहिनीरुन नळ कनेक्शन देण्याचा उघड होणार अजब फंडा.
गावातील सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असतांनाच दुसरीकडे गावातील एका उद्योपतीला मुख्य जलवाहिनीरुन नळ कनेक्शन देण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या उद्योगपतीला जवळपास सहा तास पाणी पुरवठा होत असल्याचे समजते.