ऐन वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी भारनियमन, महिलावर्ग संतप्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०६/२०२३
पावसाळ्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून उद्या दिनांक ०३ जून २०२३ शनिवार रोजी ट्री कटिंग व इतर कामे करून घेण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून भारनियमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे परंतु हे भारनियमन उद्या सकाळी आठ वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत असल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
यामागील एकमेव कारण म्हणजे उद्या महिलांचा वटसावित्री हा सण असून या दिवशी महिलावर्ग वटसावित्री पौर्णिमेचा उपवास करून आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतात व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी आराधना करतात. ही पूजा करण्यासाठी घराघरातून पुरणपोळी, आमरस व गोड, गोड नैवेद्य बनवण्यासाठी महिलांची लगबग असते व याच कालावधीत भार नियमन झाल्यास वातावरणात असलेल्या उष्णतेमुळे स्वयंपाक करतांना महिलांना जास्तच त्रास होईल म्हणून उद्याचे भारनियमन थांबवण्यात यावे अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे.