सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आरोग्य
Home›आरोग्य›आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, कळमसरा येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न.

आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, कळमसरा येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न.

By Satyajeet News
January 10, 2022
952
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०१/२०२२

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी व कळमसरा गावचे प्रथम नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सरपंच मा.श्री. अशोक दादा चौधरी यांनी गावातील जनतेच्या ऋणानुबंधाची जाणीव ठेवून कळमसरा येथे जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत श्री.गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय जळगाव यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले होते. हे शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विशेष म्हणजे या शिबिरात सर्व आजारांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच या शिबिरातील नोंदणीकृत गरजू व गरिब रुग्णांसाठी महात्मा फुले जीवनदायी योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.


हे भव्य आरोग्य शिबीर माजी आमदार मा.श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन श्री. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, आरोग्याची देवता धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय गुलाबराव देवकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी प्रदेश सरचिटणीस एजाज भाई मलिक, जळगांव महानगर अध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी, शेंदुर्णी नगरीचे प्रथम नागरिक मा.श्री. संजय दादा गरुड, मा.श्री.वाल्मिक पाटील, जामनेर पोलिस निरीक्षक मा.श्री. शिंदे साहेब, लोहारा सरपंच मा.श्री. अक्षय जैस्वाल, डॉ. मा.श्री. नितीन पाटील, मा.श्री. दिलीप पाटील, मा.श्री. प्रल्हाद बोरसे, मा.श्री. संदीप निकम, मा.श्री. नाना बोखरे,मा.श्री. बाळू सावंत,मा.श्री. नाना पाटील, उज्ज्वल निकम, मा.श्री. गौतम निकम,मा.श्री. योगीराजजी, मा.श्री. कैलास चौधरी,मा.श्री. रमेश तेली, मा.श्री. उद्धव माळी,मा.श्री. हेमंत चौधरी,मा.श्री. दिलीप पाटील,मा.श्री. प्रकाश वाघ,मा.श्री.भैय्या पाटील,मा.श्री. बबलू पहिलवान,सुरेश चौधरी,मा.श्री. ईश्वर देशमुख,मा.श्री.राहुल राजपुत,मा.श्री. गणेश पाटील,मा.श्री. शुभम मोगरे,मा.श्री. संतोष पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.




या शिबिरात डॉ.मनोज पाटील.(न्यूरो सर्जन), डॉ.अतुल भारंबे (कॅन्सर तज्ञ), डॉ.श्रीराम महाजन.(प्लॅस्टिक सर्जन), डॉ.प्रियंका चौधरी. (स्त्रीरोग तज्ञ), डॉ.अभिजीत पाटील (अस्थिरोगतज्ञ), डॉ.अनुश्री व्ही.(एम.डी.मेडिसिन), डॉ.वृषाली. व्ही.पाटील.(नेत्रतज्ञ), डॉ.नीरज चौधरी.(मूत्र विकार तज्ञ), डॉ.अतुल सोनार.(एमडी पॅथॉलॉजी), डॉ.वैभव गिरी.(स्त्रीरोग तज्ञ), डॉ. रोहन पाटील.(लॅप्रोस्कोपिक व जनरल सर्जन) डॉ. स्वप्नील गिरी.(बाल रोग तज्ञ), डॉ.आदित्य नागराजन.( त्वचारोग विकार तज्ञ), डॉ.अमित नेमाडे.(फिजिओथेरपिस्ट), डॉ.अश्विनी चव्हाण.(दंतरोग तज्ञ) या सर्व तज्ञ डॉक्टरांनी शिबिरात आलेल्या एकूण ५५९ रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले व गरजूंना पुढील उपचारासाठी सल्ला देत नोंदणीकृत गरजू व गरिब रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियाकरुन घेण्यासाठी जळगाव येथील श्री.गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय दवाखान्यात येऊन मोफत ऑपरेशन व उपचारासाठी योग्य मार्गदर्शन केले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. देवकर म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविले जाणारे देवकर हॉस्पिटल हे एकमेव आहे. येथे महात्मा फुले योजनेअंतर्गत अनेक आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. योजनेत न बसणाऱ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया सुद्धा अत्यल्प दरात येथे केल्या जात आहे. गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आर्थिक झळ बसू नये, या उद्देशाने देवकर रुग्णालय काम करीत आहे. यापुढेही गोरगरिबांच्या निरामय आरोग्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर रुग्णालय चालविले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांकडून देखील कौतुक होत आहे. माजी आमदार वाघ व संजय गरुड यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

(कार्यक्रमातील विशेषतः)


सदरील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने मंचाचे अध्यक्ष (ग्रामपंचायत सदस्य) आयुष्यमान उज्ज्वल निकम, मंचाचे कायदेशीर विधी सल्लागार (ग्रामविकास अधिकारी) आयुष्यमान संदिप चंद्रभान निकम, मंचाचे सरचिटणीस (प्राध्यापक) आयुष्यमान गौतम उत्तम निकम यांनी संविधान पुस्तिका भेट स्वरूपात देऊन ग्रामस्थांच्या व विचार मंचाच्या वतीने आभार व्यक्त केले.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी गावातील ग्रामस्थ व नऊ तरुणांनी विशेष सहकार्य केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 205
Previous Article

अनाथांची माय कै.सिंधुताई सपकाळ यांना, अंबे वडगाव ...

Next Article

भक्तांबर महिला मंडळाची कोल्हे येथील स्व.रुपचंद बाफना ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआरोग्य

    पाचोरा शहरासह तालुक्यात खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री खवय्यांच्या आरोग्याशी खेळ अन्न व औषध प्रशासन कुंभकर्णी झोपेत

    September 24, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    वडगाव आंबे बुद्रुक येथे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण, जंतुनाशके फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज.

    October 18, 2023
    By Satyajeet News
  • आरोग्य

    वरखेडी, भोकरी येथे श्री. हॉस्पिटलतर्फे मोफत तपासणी शिबिर.

    November 25, 2025
    By Satyajeet News
  • आरोग्य

    अबकी बार, आर या पार, पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी हरीभाऊ पाटील यांचा उपोषणाचा इशारा.

    June 12, 2022
    By Satyajeet News
  • आरोग्य

    लस द्या बाळा , पोलिओ टाळा.

    January 31, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, भोजे व शिंदाड येथील पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन.

    August 17, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • विविध यश, निवड.

    महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी शिंदे तर सहसचिव चंद्रकांत पाटील.

  • ब्रेकिंग न्यूज

    परिक्षा केंद्रावर शिक्षक गैरहजर राहिल्या प्रकरणी, पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज