जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी २५ जून पासून आमदार किशोर आप्पा पाटील यांचा, आमदार आपल्या दारी हा उपक्रम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०६/२०२१
पाचोरा,भडगाव तालुक्याचे लाडके आमदार कीशोर आप्पा पाटील. यांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या कोरोनाच्या काळातील व इतर समस्या जाणून व समजून घेत त्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. २५ जून पासून भडगाव तालुक्यातील प्रत्येक गावाला ते भेट घेऊन आढावा घेणार आहे. त्याच्यांसोबत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत राहणार आहे.
————
या उपक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने २५ जून पासून त्यांचा तालुक्यात नियोजित दौरा आहे. या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, स्थानिक यंत्रणा, सभापती, पंचायत समीती सदस्य तसेच गावात ग्रामपंचायत, विकास सोसायटीचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना सारख्या कठीण प्रसंगात गावकऱ्यांना उद्भवलेल्या समस्या, घरकुल योजना, कृषी योजना, पिक कर्ज, विकास कामे, शिक्षण, वीज, रेशन वाटप आदि बाबींचा आढावा घेणार आहे. तसेच ग्रामस्थांच्या समस्या ऐकुन घेत समस्याग्रस्त व संबधीत अधिकारी यांच्याशी चर्चा करुन योग्य त्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सुचना देणार आहेत.
हा दौरा एवढ्यावरच थांबणार नसून पुढच्या २~३ महीन्यात पुन्हा दौरा आयोजित करुन मागील दौऱ्याचा आढावा घेणार असल्याने समस्या सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे.
जिल्ह्यात पहील्यांच आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात असल्याने आमदारांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
असा असणार दौरा
२५ जून ला वाडे, बाबंरूड प्र.ब., नावरे, गोंडगाव, सावदे, घुसर्डी ला दौरा असणार आहे. तर २६ जून ला लोणपिराचे, बोरनार, कनाशी, बोदर्डे, निंभोरा, २७ जून ला भोरटेक- उमरखेड , तांदुळवाडी, मळगाव ला २८ जुन ला पिप्रिंहाट, शिंदि, पेंडगाव, खेडगाव, बात्सर येथे दौरा असणार आहे. २ जुलै ला आडळसे, जुवार्डी, गुढे, पथराड, कोळगाव तर ३ जुलै रोजी पिचर्डे, शिवणी, पाढरंद, वडजी, वाक येथे ४ जुलै ला वडगाव बु., बाळद,कोठली, पासर्डी ५ जुलै ला वडगाव नालबंदी, पळासखेडे, महीदंळे, वलवाडी येथे दौरा नियोजीत आहे. सदरचा दौरा हा सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल आमदार कीशोर पाटील यांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील यांनी सांगीतले.
————
प्रतिक्रीया
कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात या उद्देशाने आमदार आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. लोकाच्या समस्या गावातच सोडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
-कीशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव