पाचोरा तालुक्यात गाव तेथे बी. आर. एस. पक्षाची शाखा, श्री. किशोर आप्पा गरुड यांचे सुतोवाच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२३
पिंपळगाव हरेश्वर, वडगाव कडे येथील शेतकरी व शेतमजूर व पत्रकार विनोद पाटील व शंकर पाटील अशोक तानाजी पाटील भगवान पाटील गणेश पाटील पितांबर पाटील भागवत पाटील यांनी भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय माननीय के. सी. आर. चंद्रशेखरराव यांच्या यांच्या कार्याला प्रभावित होऊन वडगाव कडे येथील ग्रामस्थांनी किशोर गरुड व विठ्ठलराव गुंजाळ प्रकाश चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार मा. श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व महाराष्ट्राचे भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री. माणिक दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब बच्छाव साहेब यांच्या आदेशाने तालुकाप्रमुख श्री. किशोर आप्पा गरुड व श्री. राजेंद्र सिंग केशर सिंग देशमुख यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तसेच त्या ठिकाणी शेतकरी, कमिटी ओ. बी. सी. महिला कमिटी कमिट्या स्थापन केल्या.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये रामानंद पाटील मंचराम चाफा पाटील देवचंद घोगरे पाटील भगवान संपत पाटील दत्तू संपत पाटील अशा असंख्य कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्ष प्रवेश केला त्यांचे स्वागत श्री. किशोर आप्पा गरुड यांनी केले. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी आण्णा व श्री देवेंद्र आप्पा जिल्हा समनवयक यांचे मार्गदर्शना खाली काम करीत असून गावागावातून सभासद नोंदणी व शाखा स्थापन करणार असल्याचे सुतोवाच पाचोरा तालुकाध्यक्ष मा. श्री. किशोर गरुड यांनी सत्यजित न्यूज कडे व्यक्त केले.